HOME   महत्वाच्या घडामोडी

बेद्रेंना अशोकरावांची ताकद, औरंगाबादचा कचरा, अशोकरावांनी टाळल्या वैयक्तिक भेटी, सोशल मिडियावर चाकूरकर, श्रीदेवीच्या अस्थी विसर्जित....०५ मार्च २०१८

बेद्रेंना अशोकरावांची ताकद, औरंगाबादचा कचरा, अशोकरावांनी टाळल्या वैयक्तिक भेटी, सोशल मिडियावर चाकूरकर, श्रीदेवीच्या अस्थी विसर्जित....०५ मार्च २०१८

* सरोगसीद्वारे सनी लिओनीने मिळवले जुळे, आता तीन लेकरांची आई!
* अहमदनगरच्या उप महापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे
* तुला बघून घेतो, तुझी औकात काय? असे म्हणाले चंद्रकांत पाटील- आ. कपील पाटील
* विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव अणण्याचे प्रयत्न सुरु
* आ. प्रशांत परिचारक यांना विधानसभेतून बडतर्फ करा, विरोधकांची जोरदार मागणी
* बेद्रे, करते व्हा, चालवा कॉंग्रेस! अशोकराव चव्हाण यांनी दिली लातूर भेटीत उर्जा!
* सोशल मिडीयामुळे कॉंग्रेस मजबूत होईल पण विचाराने कमजोर होईल- शिवराज पाटील चाकूरकर
* शिक्षिकेला फसवल्याप्रकरणी राजेंद्र इंद्राळ्संसह चौघांवर गुन्हा
* संघटनात्मक निवडणुकीसाठी लातूर राष्ट्रवादीची आज बैठक
* कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाणांनी कॉंग्रेसच्या नाराज गटाला दिला कानमंत्र
* अशोकराव चव्हाण यांनी टाळल्या लातुरात कॉंग्रेस नेत्यांच्या वैयक्तिक भेटी
* १८ व्या दिवशीही औरंगाबाद कचरा विल्हेवाटाची कोंडी कायम, आज न्यायालयात सुनावणी
* पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी आणखी चौघांना अटक, दोन कर्मचारी आणि लेखापालाचा समावेश
* अमित शाह यांनी घेतली सरसंघचालकांची भेट, दोघात साडेतीन तास चर्चा
* नागपुरात नऊ, दहा आणि अकरा मार्चला संघ प्रतिनिधींची बैठक
* श्रीदेवीच्या अस्थींचं रामेश्वरम विसर्जन, दोन्ही मुलीही उपस्थित
* केज तालुक्यातील उत्तरपत्रिका जळीत प्रकरणी १४ जणांना नोटिसा
* भेल कंपनीच्या आठ लोकल मुंबईच्या सेवेतून हटवल्या
* गोव्यातील अभयारण्यातील पिंजर्‍याचं दार अज्ञातांनी उघडल्यानं चार बिबटे फरार
* भाजपाच्या पराभवासाठी मायावतींची समाजवादी पार्टीला मदत
* औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, जालना जिल्ह्यांवर पाणी टंचाईचे सावट, ०५ हजार ११८ गावे, १२४६ वाड्यांचा ६७ कोटींचा टंचाई आराखडा सादर
* सैनिकांच्या कुटुंबीयांबाबत असभ्य बोलणार्‍या प्रशांत परिचारकांचे निलंबन रद्द करण्याचा ठराव मंजूर झालाच कसा?- सेनेसह विरोधक
* परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याचा ठराव आज आणणार- शिवसेना
* बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरचा बहिष्कार कायम, ठोस निर्णय होपर्यंत बहिष्कारावर प्राध्यापक संघटना ठाम
* नदी संवर्धन ध्वनीचित्रिफीत: मुख्यमंत्र्यांना अडचणीचे प्रश्न विचारल्याने कोठडीत घाला, पण प्रश्न विचारणारच- काँग्रेसचे सचिन सावंत
* सामाजिक कामासाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर खोटेनाटे आरोप करणाण्याचा काँग्रेसचा उद्योग, हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार- भाजप
* अमित शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात संघ मुख्यालयात साडेतीन तास चर्चा
* बीड शहराच्या मुख्य वळण रस्त्याला जोडणाऱ्या छोटय़ा पाच रस्त्यांच्या कामास नितीन गडकरींची संमती- राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर
* राज्यातील पहिले कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केंद्र पुढील आठवड्यात जे. जे. रुग्णालयात होणार सुरू
* ६४ कंपन्या व व्यक्तींना मालमत्ता विकण्यापासून राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने केला मज्जाव
* संमतीशिवाय मेल अकाउंटवरून इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रती काढल्या- भोसरीत पतीने पत्नी व मेहुण्याविरोधात केला गुन्हा दाखल
* मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारणार- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे
* सोलापूर विद्यापीठाला अहल्याबाईंचे नाव देण्याचा होणार पुनर्विचार, विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती
* भांडवल बाजारातील कंपन्यांना बुडवलेल्या कर्जांचा तपशील मागण्याचा सेबीचा विचार
* प्रेमास नकार, पुण्यात बनावट फेसबुक अकाउंट उघडून तरुणीची बदनामी, गुन्हा दाखल
* रेल्वेचा मार्ग, स्टेशनवर गाडी पोहोचण्याची वेळ, विशिष्ट प्रवासी कोणत्या डब्यात बसला आहे याची माहिती उपलब्ध होणार
* जम्मू-काश्मीर: शोपियान जिल्ह्यात गस्तीपथकावर हल्ला, एका दहशतवाद्यासह चार जण ठार
* डहाणू तालुक्यात धामणगाव आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, अधीक्षकाला अटक
* राज्यात १३१ नव्या कॉलेजांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता, पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबर सेल्फ फायनान्स अभ्यासक्रम
* रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी धावत्या मेल-एक्स्प्रेसमध्ये 'सर्व्हिस कॅप्टन' नेमावा- रेल्वे समिती
* राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व नायब राज्यपालांच्या वाहनांना नोंदणीकृत क्रमांक दिले जाणार- वाहतूक मंत्रालयाचे प्रतिज्ञापत्र
* बुधवारी मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी विदर्भात गारपीट होण्याचा इशारा
* ईशान्येकडील राज्यात भाजपच्या कामगिरीचे श्रेय पंतप्रधान आणि अमित शहा यांना जाते- उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ


Comments

Top