logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   काल, आज आणि उद्या

दिवेगावकरांनी घेतला पदभार, इच्छा मरणाला परवानगी, महाराष्ट्र आघाडीवर, शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता...... ०९ मार्च २०१८

दिवेगावकरांनी घेतला पदभार, इच्छा मरणाला परवानगी, महाराष्ट्र आघाडीवर, शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता...... ०९ मार्च २०१८

* लातूर मनपाचे नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांनी घेतला पदभार
* स्वेच्छा मरणाला सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
* पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी क्षेत्रात कारखान्यात बॉयलरचा स्फोट, १३ जण जखमी
* दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर- आर्थिक पाहणी अहवाल
* राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्यासाठी आलेले ७५० कोटी पडून, लसीकरणाचा वेगही मंदावला- आर्थिक पाहणी अहवाल
* राज्य प्रगतीच्या मार्गावरच, उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाची वाढ आणि कृषी उत्पादनातील घट चिंतेची बाब- सुधीर मुनगंटीवार
* कृषी आणि संलग्न क्षेत्रात ३७ विषयांत तरतुदीत ८३ हजार १८४ कोटी वाढ झाल्याचा मुनगंटीवार यांचा दावा
* राज्य साक्षरता, दरडोई उत्पन्न, अन्नधान्याचे दरडोई उत्पादन, वनक्षेत्राची घनता, वृक्षराजीचे आच्छादन बाबींत इतर राज्यांच्या तुलनेत मागेच
* कृषी, उद्योग, स्थावर मालमत्ता, हॉटेल व्यवसाय क्षेत्रांमध्ये गतवर्षांच्या तुलनेत पीछेहाट
* धुळे येथे अधिकाऱ्याला लाचप्रकरणातून सोडविण्यासाठी ४० हजाराची लाच मागणारा चौकशी अधिकारी गजाअड
* धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारकडून देण्यात आलेला जमिनीचा मोबदला कुटुंबाने नाकारला
* देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात याचिकेवर बाजू मांडणारे वकील अभियान बाराहाते यांना मुख्यमंत्र्यांच्या चुलतबंधुंची धमकी- नाना पटोले
* गारपीट, दुष्काळ, पाणीटंचाईमुळे राज्याच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातही लक्षणीय घट होण्याची शक्यता
* अकरावी प्रवेशांसाठी कला आणि क्रीडा क्षेत्रासाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय होणार रद्द
* मराठवाडा विभागाच्या विभाजनाचा सांगोपांग विचार करूनच निर्णय होणार- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
* औरंगाबाद महापालिकेत २५ वर्षांपासून सेनेची सत्ता, कचऱ्याचा प्रश्न सेनेमुळेच चिघळला, महापालिका बरखास्त करा - धनंजय मुंडे
* औरंगाबादेतील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रसामुग्री टेंडर न काढता तत्काळ खरेदी करणार- रामदास कदम
* अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलन तयारीसाठी १३ मार्चला राळेगणसिद्धीत कार्यशाळा
* दाऊदचा साथीदार फारुख टकला याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
* नगरचे बडतर्फ माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची खुर्ची सेना कार्यकर्त्यांनी तोडली
* औरंगाबाद येथे वाद मिटेपर्यंत खदानी भागात कचरा टाकणार- पर्यावरण मंत्री रामदास कदम
* नेफियू रियो नागालँडचे नवे मुख्यमंत्रीपद, राजभवनाबाहेर घेतली शपथ
* कर्नाटक राज्याच्या ध्वजाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले अनावरण, केंद्र सरकारची घेणार परवानगी
* टी-२० तिरंगी मालिका: भारताचा बांगलादेशवर ०६ गडी राखून विजय
* श्रीलंकेत उसळला पुन्हा हिंसाचार, अनेक दुकाने आणि घरांची नासधूस
* अमेरिकेतील टेक्सास राज्यात निवडणुकीच्या प्रायमरीत भारतीय वंशाचे प्रिस्टन कुलकर्णी


Comments

Top