HOME   महत्वाच्या घडामोडी

हम दो हमारे दो, एकबोटे आत भिडे बाहेर, शरिफांच्या घराजवळ स्फोट, तिरुपतीच्या दानपेटीत बाद नोटा, केईएमचे छ्त कोसळले....१५ मर्च २०१८

हम दो हमारे दो, एकबोटे आत भिडे बाहेर, शरिफांच्या घराजवळ स्फोट, तिरुपतीच्या दानपेटीत बाद नोटा, केईएमचे छ्त कोसळले....१५ मर्च २०१८

* मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या डायलिसिस विभागाचे छत पडल, दोघे जखमी
* पूर्ण आकार भरुनही लतुरच्या मालमत्ताधारकांना नोटिस
* औशाच्या चार नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस
* देशाचे लोकसंख्या मोठी समस्या पण त्यावर कुणीच बोलत नाही, उद्या याच विषयावर लातुरात रॅली
* गुप्तहेर रजनी पंडीत कारागृहाबाहेर, पुस्तक लिहिणार, आरोप खोटे, पंडितांचा दावा
* भिमा कोरेगाव प्रकरणी मिलींद एकबोटेंना अटक, भिडे गुरुजी निवांत
* बैलगाडा स्पर्धेप्रकरणी पुण्य़ात मालकांना अटक, बैलांची रवानगी कोंडवाड्यात
* लातुरचा पाणी पुरवठा सुरु झाला, सुरळीत झाला पण अनेक भागात जुन्या, जिर्ण आणि बिघडलेल्या पाईपलाईनमुळे अल्प पाणीपुरवठा
* मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांची लाल त्सुनामी थंडावली
* थोर शास्त्रज्ञ स्टीफन कॉकिन्स यांचे वयाच्या ७६ वर्षी निधन
* १२ वीच्या रसायनच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका, किमान ०७ गुणांचे गिफ्ट मिळणार
* एमपीएससीच्या विरोधात मुंबईत विद्यार्थ्यांचा मोर्चा
* लाल त्सुनामीत शेतकर्‍यांनी दिलेली थप्पड सरकारच्या लक्षात राहणार- शिवसेना
* उदीत नारायणच्या पोराने दोन गाड्यांना दिली धडक, अटक आणि जामीन
* सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनावर आणि त्यांच्या डिनर डिप्लोमसीवर शिवसेनेचे ताशेरे
* स्नेहभोजनात सहभागी झालेल्या २० पक्षांना संबोधले ‘भोजनभाऊ’, विरोधकांनी रणशिंग फुंकल्याची भावना दिसली नसल्याचा सामनाच्या अग्रलेखात टोला
* जसे सर्जिकल स्ट्राइकने पाकचे काहीही वाकडे झाले नाही तसे सोनियांनी बोलावलेल्या भोजनभाऊंचे होऊ नये
* सोनिया गांधी २०१९ साली भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखणार म्हणजे काय करणार? आगापिछा नसलेल्या भोजनभाऊंचा गोतावळा जमवून कसे रोखणार?
* प्रश्नपत्रिका वितरणाची स्वतंत्र कार्यक्षम यंत्रणा नसल्याने आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पायाभूत आणि नववीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी परीक्षा केली रद्द
* शेतासाठी पाणी सुरू झाले नाही तर आत्महत्या करावी लागेल म्हणणार्‍या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अभियंत्याने दिला आत्महत्या करण्याचा सल्ला, आत्मदहनाचे निवेदन
* औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर, नांदेड आणि जळगाव जिल्ह्यात महाआरोग्य शिबीरात होणार ०१ लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया, दोन महिन्यात शस्त्रक्रिया होणार पूर्ण
* अमरावतीत तीन सतरा वर्षीय मुलींना फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस
* भीमा कोरेगाव हिंसाचार घटनेला जबाबदार असलेले संभाजी भिडेंना अटक करा, अन्यथा आंदोलन- अकोल्यात भारिप बहुजन महासंघाचा आंदोलनाचा इशारा
* नाशिक येथे कमी गुणवत्तेची कोथिंबीर बियाण्यांची विक्री करणार्‍या गुजरातमधील एका कंपनीसह दोन विक्रत्यांविरोधात गुन्हे दाखल
* चुकीचे वीज बिल आकारले, ग्राहकाची ०१ लाख ३५ हजार ३३० अतिरिक्त रक्कम व्याजासह परत करण्याचे औरंगाबाद महावितरणला ग्राहक मंचचे आदेश
* उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघातून समाजवादी पक्ष विजयी
* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घराजवळ झालेल्या स्फोटात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह ०७ जण ठार, १८ लोक जखमी
* पीएनबी बॅंक घोटाळा: नीरव मोदीने १२ हजार कोटींचा चुना लावला हा देशाच्या भविष्यावरचा सगळ्यात मोठा दरोडा- आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल
* बँकिंग क्षेत्रातील प्रणाली सुधारण्यासाठी शंकराप्रमाणे नीळकंठाचा अवतार धारण करण्याची तयारी- उर्जित पटेल
* केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करणाऱ्या विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जुन्या आठवणींना दिला उजाळा
* इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्त्व आणि निकाह-हलाला या प्रथा रद्द करण्यासाठी आणि बेकायदेशीर ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
* तिरुपती मंदिराच्या हुंडीत चलनातून बाद झालेले ५०० आणि ०१ हजारांच्या २५ कोटी नोटा जमा- ‘हिंदुस्थान टाइम्सचे’ वृत्त
* मुंबई - एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट गुरुवारी सकाळी काही तासांसाठी हॅक, आता सर्वकाही सुरक्षित
* गांधीनगर- गुजरात विधानसभेत बुधवारी प्रचंड गदारोळ, कॉंग्रेस व भाजप आमदारांत शिवीगाळ आणि गुद्दागुद्दी झाली, ध्वनिक्षेपकांची तोडफोड
* नवी दिल्ली- राम जन्मभूमी मंदिराची जागा मुस्लिम समुदायाने हिंदूंना भेट स्वरूपात द्यावी- आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर
* बिहारमध्ये एक लोकसभा व दोन विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपच्या आघाडीला मोठा धक्का
लखनऊ - उत्तर प्रदेशमधून चौथ्यांदा राज्यसभा खासदारकीची निवडणूक लढणाऱ्या जया बच्चन यांनी 10 अब्ज रुपयांची संपत्ती घोषित केली


Comments

Top