HOME   महत्वाच्या घडामोडी

शिवाजी चौकात दगडफेक, सोमवारी मोदींवर अविश्वास, शादीखाना लवकरच, सवलतीत साखर, मेहंदीला कारावास.....१६ मार्च २०१८

शिवाजी चौकात दगडफेक, सोमवारी मोदींवर अविश्वास, शादीखाना लवकरच, सवलतीत साखर, मेहंदीला कारावास.....१६ मार्च २०१८

* शिवाजी चौकात दगडफेक, बाजार बंद, अज्ञातांनी केली दगडफेक
* ‘जनसंख्या विरोधी कानून बनाओ’ आंदोलकांवर दगडफेक झाल्याने, त्याची प्रतिक्रिया उमटली लातुरात
* शादीखान्यासाठी वेगळी जागा-निधी मिळाला, कन्हेरी शिवारात लिंगायत स्मशानभूमी- महापौर
* विलास साखर कारखान्यातर्फे सभासदांना सवलतीच्या द्दरात साखर वाटप
* पाडव्याआधी सुरु करा पथदिवे अन पाणी पुरवठा सुरळीत- नगरसेवक राजा मनियार
* तेलगू देसमने काढला केद्र सरकारचा पाठिंबा, सोमवारी अविश्वास ठराव
* मानवी तस्करी प्रकरणी पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांचा कारावास
* अभिनेता इरफान खानला न्यूरोएंडोक्रीन ट्यूमर, उपचारासाठी प्रदेशी जाणार
* विधानसभेत अनेक सदस्यांनी केली मुंबई शहरातील ऑटो रिक्षाचालकांची तक्रार
* अवैध विद्यार्थी वाहतूक करणार्‍या ६० स्कूल बसेस आणी ऑटोंवर लातूर आरटीओकडून कारवाई
* आरटीओच्या वायूवेग पथकाची कारवाई
* अवैध विद्यार्थी वाहतूक करणारी लातुरचे ६० वाहने कार्यालयात लावली
* ४७ ऑटोरिक्षा, ०४ स्कूल बसकडे नव्हते परवाने, १३ बएसकडे नव्हती कागदपत्रे
* दरवर्षी मे-जूनमध्येच व्हायची स्कूल बएसवर कारवाई
* लातुरात शनिवारी लातुर डेअरी फार्मचे उदघाटन
* जिल्हा निर्मितीसाठी उदगेरमध्ये मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली सामाजिक संघटनांचे निवेदन
* अहमापूर नगर परिषदेवर छोटे हातगाडे, व्यावसायिकांचा मोर्चा
* लातुरात अखेर शादीखान्याचा मार्ग मोकळा
* मळवटी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेले पाच जण जेरबंद, २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
* लातुरात अॅटोरिक्षा परवाने वाटप होणार ०१ एप्रिलपासून बंद
* पथदिवे चालू करण्यासाठी न्मनसेनं काढली लातूर शहरात मदत फेरी
* पत्नीला सळणार्‍या मोहम्मद शमीचं आयपीएलमधील भवितव्य धोक्यात
* कॉंग्रेस नवी दिल्ली आज महा अधिवेशन
* आयपीएल गवर्निंग कमितेची आज बैठक
* रशियात चलत्या विमानातून दार उघडल्याने पडला सोने, चांदी आणि हिर्‍यांचा पाऊस
* राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या ताट, वाटय़ा, चमचे, पेले, कपाबरोबरच जाहिरातींचे फ्लेक्स, बॅनर्स, तोरणवर बंदी
* बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजारांचा दंड, ०३ वर्षांचा तुरुंगवास, बंदीत प्लास्टिक बाटल्या, दुधाच्या पिशव्यांचा समावेश नाही
* भीमा कोरेगाव हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाखाची मदत, जखमीला देणार ०५ हजार देणार
* राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील ७०० फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी द्या- उद्धव ठाकरे
* सोलापूर जिल्ह्यात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त, वीज वितरणवर हल्ला, तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी
* औरंगाबाद कचराकोडी: पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना पाठवणार सक्तीच्या रजेवर- मुख्यमंत्री
* कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
* गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकांमधला पराभव हा भाजपाच्या अहंकाराचा आणि उन्मत्तपणाचा पराभव- उद्धव ठाकरे
* मित्रांना दूर लोटले व खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटेच येतात- सामनाचा अग्रलेख
* उत्तर प्रदेशातील पोटनिवडणूक पराभवाने त्रिपुरा विजयाचे लाडू भसकन तोंडाबाहेर पडले
* मोदी सत्तेवर आल्यापासून १० लोकसभा पोटनिवडणुकातील ०९ जागांवर भाजपचा पराभव
* पश्चिम विदर्भातील ०५ जिल्ह्यातील ०३ हजार ४२४ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट
* पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये रुग्णावर जादूटोणा करणार्या मांत्रिकाला ०३ दिवसांची पोलीस कोठडी
* पुणे येथे दोराबजी मॉलजवळ सापडला जिवंत हँडग्रेनेड
* आज २५ हायब्रीड बस मुंबईकरांच्या सेवेसाठी होणार दाखल
* संभाजी भिडे यांना २६ मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा- प्रकाश आंबेडकर
* छोट्या शेतकऱ्यांकडे वसुली करण्याऐवजी मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करा- नाशिकमध्ये स्वाभिमानीचे ठिय्या
* अयोध्येत राम मंदिर होणारच श्री श्री रविशंकर यांना विश्वास
* पीएनबीच्या मुंबईतील शाखेत ०९.९ कोटीचा आणखी एक घोटाळा उघड
* रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी आणि मुलगा राहुल कोठारी यांचा जामीन अर्ज फेटाळला
* स्पर्धा परीक्षांचे प्रश्न मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या भरती परिक्षेत, याबाबत सरकारने निवेदन करावे- विधान परिषद सभापती
* पालघरमध्ये २२ तृतीयपंथीयांनी उभारली साडेसात हजार शौचालये
* प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन आहे का, वृद्धाश्रम कायद्यातील तरतुदी सातत्याने प्रसिद्ध करता का?- उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला प्रश्न
* राज्यात सरकारी वृद्धाश्रमांमध्ये फ़क्त ०२ हजार वृध्द्दांसाठी व्यवस्था असल्याबद्दल न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य
* पालघर जिल्हा पोलिस दल भरती- आयुर्वेदिक डॉक्टर, इंजिनीअर, बीएससी, बीफार्म, इंटिरिअर डिझायनर, संगीत पदवीधरांचे अर्ज
* कॉल डिटेल्स रेकॉर्ड प्रकरणी नाव आल्याने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीला अटकेची भीती
* मुंबईतील वाहतूककोंडीसाठी खराब रस्ते आणि खड्डे कारणीभूत, यावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची- राज्य सरकार
* १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देणारे विधेयक हरियाणा विधानसभेत मंजूर
* 'आयएनएक्स मीडिया' गैरव्यवहारातील कार्ती चिदंबरमना मनी लाँडरिंगमध्ये २६ मार्चपर्यंत अटक करु नका- सर्वोच्च न्यायालय
* तामिळनाडूत अण्णादुराई, एम.जी. रामचंद्रन आणि पेरियार यांच्या अर्धपुतळ्यांना घातले भगवे कपडे
* तेलुगु देशमची आज हैद्राबादेत पॉलिट ब्युरोची बैठक
* भुवनेश्वरला जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील अनिवासी भारतीय देवी पिल्ले मुंबईत परतल्या सुखरुप
* इंग्लंड ओपन २०१८: पी. व्ही. सिंधू नित्चाओन जिंदापोलला नमवून उपांत्यपूर्व फेरीत दाखल


Comments

Top