• 19 of April 2018, at 5.17 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
news image सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 news image हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर news image अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 news image लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 news image ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501

HOME   महत्वाच्या घडामोडी

अवकाळी-गारांच्या पावसाने नुकसान, लातुरात कडकडे, नाना कॉंग्रेसच्या बाजुने, आजपासून आयपीएल, सलमानच्या वकिलाला धमक्या.......०७ एप्रिल २०१८

अवकाळी-गारांच्या पावसाने नुकसान, लातुरात कडकडे, नाना कॉंग्रेसच्या बाजुने, आजपासून आयपीएल, सलमानच्या वकिलाला धमक्या.......०७ एप्रिल २०१८

* उदगीर, निलंगा आणि औशासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारा, वादळ शेतीचे मोठे नुकसान
* औशात वीज पडून गाय दगावली, उदगीरमध्ये वीज पुरवठा खंडीत
* लातूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याणच्या ७२ कर्मचार्‍यांचे वेतनासाठी उपोषण
* लातूर पोलिस दलातील चार अधिकार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या
* शिरुर अनंतपाळ तालुक्यात ५१ गावात ११७ वीजचोरांना दंड
* सोशल मिडीयावर बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना, चाकुरात गुन्हा दाखल
* विधीमंडळाच्या २१ आमदारांची अंदाज समिती ११ ते १३ दरम्यान लातूर दौर्‍यावर
* १५ एप्रिल रोजी दयानंद सभागृहात पंडीत अजित कडकडे यांची मैफल
* जुन्या पेन्शनसाठी आज लातुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन
* आज जागतिक आरोग्य दिन
* संरक्षण, गृह, कायदा मंत्रालयाची संकेत स्थळे चीन कडून हॅक झाल्याचा संशय
* सलमानला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बढतीमुळे बदली, सलमानच्या जामिनावर टांगती तलवार
* मराठवाड्यात गारांसह अवकाळी, दोन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात मेघगर्जनेसह होणार पाऊस
* मुंबईतील पेपरफुटीसंबंधात शिक्षकासह आणखी एकाला अटक, आतापर्यंत १५ जण गजाआड
* बारावीच्या ८५ लाख तपासलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडेच, शिक्षणमंत्र्यांकडून आदेश न आल्यामुळे आंदोलन कायम
* राज्यात १० जिल्हा रुग्णालयात कोमोथेरपीची सेवा जूनपासून होणार सुरु
* राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमधील ०८ हजार ९२१ पदांच्या भरती प्रक्रियेला उच्चन्यायालयाची अंतरिम स्थगिती, पुढची सुनावणी ११ एप्रिलला
* संवैधानिक मान्यतेसाठी ०८ एप्रिल रोजी लिंगायत समाजाचा महामोर्चा
* मुंबई आणि उपनगर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे स्थापन नाही, राज्य सरकारला न्यायालय अवमानाची नोटीस
* १५ दिवसांत दोन्ही प्राधिकरणांची स्थापना करण्याची राज्य सरकारची न्यायालयात हमी, न्यायालयाने घेतली नोटीस मागे
* भाजप महामेळावा:
* घटनेने दिलेले आरक्षण रद्द भाजपा करणार नाही- अमित शहा
* राहुल गांधी शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावर बोलतात - अमित शहा
* २०१९ च्या निवडणुकीत आम्ही प्रचंड बहुमताने जिंकणार- अमित शहा
* ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणार- अमित शहा
* आमच्यासोबत रहावं हीच आमची हार्दिक इच्छा- अमित शहांचा सेनेला सल्ला
* भाजप सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष- देवेंद्र फडणवीस
* मी रिकाम्या नव्हे, भरलेल्या वर्गाचा मॉनिटर- फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
* चहावाल्याच्या नादी लागाल तर धूळधाण होईल- फडणवीस
* भाजप पिता-पुत्राचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष- नितीन गडकरी
* अमित शहा यांनी भाजपच्या सर्व आमदारांची घेतली कडक हजेरी
* 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या मेट्रो-३ मार्गाला गाड्या पुरवण्यासाठी पाच कंपन्यांची तयारी, तीन कंपन्या भारतीय
* नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड
* झोपडपट्टी पुनर्वसन योजना घोटाळा: वांद्रे येथील ४६२ कोटीची ३३ घरे जप्त
* पैठण येथे सातवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंड
* काँग्रेसच्या काळात काहीच झालं नाही असं म्हणू नका- नाना पाटेकर पुण्यात
* जयसिंगपूरमधील जैन मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी राजस्थानातून दोघांना अटक
* शिर्डीत ऑगस्टमध्ये होणाऱ्या साईबाबा शताब्दी महोत्सवास पंतप्रधानांना निमंत्रण
* घटस्फोटीत मुलीशी लग्न केल्याने वाळीत टाकणार्‍या नगर जिल्ह्यातील वाघवाले जमातीच्या सात पंचांविरुद्ध गुन्हा दाखल
* शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी मुखर्जी रुग्णालयात दाखल
* भारत बंद आंदोलनादरम्यान हिंसा, सामाजिक सलोख्याच्या संरक्षणासाठी ०९ एप्रिलला काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन
* भारत सरकारची ११० लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी निविदा, बोईंग, लॉकहूड मार्टिन, साब, डेसॉल्ट कंपन्या पुढे येण्याची शक्यता
* संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप, कामाचे १२७ तास गेले वाया
* कोलकाता विमानतळावर ५४ किलो सोन्यासहीत चारजणांना अटक
* बंगळुरूमध्ये एका कारमधून दीड कोटी जप्त
* आयोध्या प्रकरणावर २७ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालतात सुनावणी
* धमकीचे एसएमएस, सलमानच्या जामीन अर्जावरील सुनावणीला हजर न राहण्यासाठी धमकीचे इंटरनेट कॉल्स- सलमानचे वकिल महेश बोरा
* 'आयपीएल' क्रिकेट सामन्याला पाणी वाटपाचे मुंबई महापालिकेचे ताजे धोरण काय?- उच्च न्यायालय
आयपीएलला आजपासून सुरुवात, वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सलामीची लढत
भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दीपक लाथेरला कांस्य पदक


Comments

Top