HOME   महत्वाच्या घडामोडी

आलमल्यात पाण्यासाठी श्रमदान, आता संघर्ष हरभर्‍यासाठी, या वाहनांचं करायचं काय? सदाभाऊंची मागणी, दीड लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स.......१० एप्रिल २०१८

आलमल्यात पाण्यासाठी श्रमदान, आता संघर्ष हरभर्‍यासाठी, या वाहनांचं करायचं काय? सदाभाऊंची मागणी, दीड लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स.......१० एप्रिल २०१८

* पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत आलमलाचे विश्वेश्वरय्या तंत्र महाविद्यालय सहभागी, सकाळी पाचपासून श्रमदान
* लातुरचे नगरसेवक व्यंकट वाघमारे यांचा आज वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव
* आलमला येथील विश्वेश्वरय्या तंत्र महाविद्यालयाचा सगळा कर्मचारी वर्गही श्रमदानात सहभागी, सुमारे १५०० जण लागले कामाला
* उदगीर नगर परिषद व्यापारी संकुलाचा बांधकामास मनाई
* माकणी थोर येथे वीज पडून गाय आणि बैलाचा मृत्यू
* लातूर शहरात सकाळी खाजगी वाहने येतात अतीवेगाने, होतात अपघात, नियंत्रण कुणाचं?
* शेतकर्‍यांच्या तुरीचे पैसे द्यावेत यासाठी शेतकरी संघटनेने मार्केटींग फेडरेशनला ठोकले टाळे
* गणवेश सक्तीएसाठी पाच हजार ऑटोचालकांवर दंडात्मक कारवाई
* आता हरभर्‍याचा प्रश्न: लातुरात हमीभाव खरेदी केंद्र सुरु, सरकारने दिला ४४०० रुपयांचा भाव
* तुरीच्या सरकारी खरेदीला ०१ मे पर्यंत मुदतवाढ द्या, सदाभाऊ खोत यांनी केली केंद्राकडे मागणी
* दिल्लीत उपोशःअण सुरु करण्यापूर्वी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मारला छोले भटुर्‍यावर ताव
* भारतीय लष्कराला मिळणार ०१ लाख ४० हजार बुलेटप्रूफ जॅकेट्स
* १२ हजार कोटींना चुना लावणार्‍या नीरव मोदीच्या अटकेसाठी हॉंगकॉंग मदत करणार
* कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी मुंबईतील धार्मिक स्थळांचा पुढाकार
* १२ मे रोजी पहिला सामूहिक विवाह सोहळा, १०० मुलींचा लागणार विवाह
* शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १७ एप्रिलला अर्थमंत्र्यांसोबत बैठक, ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचे आंदोलन स्थगित
* नगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक
* नगरमध्ये दोन शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर दगडफेक, रास्ता रोको आणि बंद, सहाशे सेना कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल
* हायकोर्टाने निर्देशानंतरही विकास आराखडा, नियम मराठीत न दिल्याने मनसेने दाखल केली मुख्यमंत्र्यांविरोधात अवमान याचिका
* तपासणी अहवालासाठी चार हजाराची लाच घेणार्‍या कोल्हापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचा प्राध्यापक गजाआड
* मेळघाटात ढाणा गावात आदिवासींची ४० घरं जळून भस्मसात
* नागपूरमध्ये लष्करी छावणीत कारमध्ये सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारा सुरक्षा रक्षक अटकेत
* पोलिसांवर भरवसा नाही, तपास सीबीआयमार्फत करा, खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा- वसंत ठुबे यांचे कुटुंबीय
* जिवाला धोका, मानसिक आघातही होण्याची भीती अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयाने १३ वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताची दिली परवानगी
* दहावीच्या पुस्तकात पत्रलेखनाच्या पारंपरिक पद्धतीऐवजी ई-पत्राचा समावेश
* कर्जमाफीवरून शेतकऱ्यांविरुद्ध खासदार-आमदारांची संघटित गुन्हेगारी, सुकाणू समिती निवडणुकीत उतरणार
* पुणे येथे झोपडपट्टी कामगारांपासून आयटी इंजिनीअर, उच्च शिक्षित यांच्यात गांजाला वाढली मागणी
* दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात भाजप आणि सेनेचे गुणगान, अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर, कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा
* पुणे येथे पीठाच्या गिरणीत महिलेची ओढणी अडकली, चेहरा गिरणीत अडकल्याने महिला गंभीर जखमी
* ०५ संतांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला, मध्य प्रदेश सरकारला हायकोर्टाची नोटीस, ०३ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश
* कोलकात्याच्या डमडम रेल्वे मार्गावर स्फोट, ०१ गंभीर, १० गावठी बॉम्ब जप्त
* हिमाचल प्रदेशात स्कूल बस खोल दरीत कोसळली, २९ विद्यार्थी ठार
* तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांच्या अटकपूर्व जामिनाला ३० मे पर्यंत मुदतवाढ
* राष्ट्रकुल स्पर्धाः बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत भारताला सुवर्ण पदक
* एअर रायफल शूटिंग महिलांच्या स्पर्धेत मेहुली घोषला रौप्य तर अपूर्वीला कांस्य पदक
* टेबल टेनिसमध्ये (पुरुष गट) भारताने जिंकले सुवर्ण पदक
* आयपीएलः हैदराबादचा राजस्थानवर ९ गडी राखून विजय
* युजर्स डेटा लीक प्रकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गची तयारी
* सीरियाच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ला


Comments

Top