HOME   महत्वाच्या घडामोडी

महामानवाला अभिवादन, प्लास्टीक बंदी कायम, कर्नाटकात कॉंग्रेस राहणार वरचढ, शहिद थोरातांवर अंत्यसंस्कार, आधारची गोपनीयता हवीच.......१४ एप्रिल २०१८

महामानवाला अभिवादन, प्लास्टीक बंदी कायम, कर्नाटकात कॉंग्रेस राहणार वरचढ, शहिद थोरातांवर अंत्यसंस्कार, आधारची गोपनीयता हवीच.......१४ एप्रिल २०१८

* महामानव, भरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती, दीक्षाभूमी-चैत्यभूमीवर अलोट भीमसागर
* लातुरात रात्री बारा वाजल्यापासूनच महामानवाला अभिवादन, फटाकेही फोडले
* प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार, नागरिकांना दंडात्मक कारवाईपासून तीन महिन्यांसाठी संरक्षण
* कर्नाटकात निवडणुकात कॉंग्रेसच राहणार वरचढ, पण बहुमत मिळणार नाही: पाहणी निष्कर्ष
* भीम अ‍ॅप वापरणार्‍यांना मिळणार कॅश बॅक
* अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सत्तेत आल्यापासून चहापानावर केला सव्वा कोटीचा खर्च
* नाणार प्रकल्प मंजूर पण जागेचा उल्लेख नाही, प्रकल्पग्रस्त भेटणार राज ठाकरे यांना
* शरद पवार १० मे रोजी नाणार प्रकल्प स्थळाला देणार भेट
* औरंगाबादेत बस चालवत व्हाट्सअ‍ॅपवर चॅटींग करणार्‍या चालकाला केले निलंबित
* सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने पाचशे हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान, वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू, १० जनावरे दगावली
* मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी, २१ दिवसांत प्लास्टिकच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश
* केडगाव शिवसेना कार्यकर्ते हत्याप्रकरणातील दोन आरोपींना अटक
* नगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिलेंसह १७ जणांना न्यायालयीन कोठडी
* एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ०३ पुरुष व ०३ महिला पोलीस कर्मचा‍यांकडून होणार उमेदवारांची तपासणी
* मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंची आज घोषणा होण्याची शक्यता
* नायर रुग्णालयातील एमआरआय अपघातप्रकरण: रुग्णालयातील आया, वॉर्डबॉय दोषी
* विविध वैज्ञानिक मागण्यांसाठी आज देशात अनेक शहरांत 'इंडिया मार्च फॉर सायन्स' मोर्चाचे आयोजन
* औरंगाबाद जिल्ह्यात शहीद जवान किरण थोरात यांच्यावर अंत्यसंस्कार
* मुंबईत पार्किंगचा प्रश्न गंभीर व महत्त्वाचा, पार्किंगवरच स्वतंत्र कायदा करण्याची गरज- उच्च न्यायालय
* कर्नाटक विधानसभा निवडणुक: आजतकचा ओपिनियन पोल सांगतो काँग्रेसचं येणार सत्तेवर, २२५ पैकी काँग्रेसला मिळणार ९० ते १०१ जागा
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं केलं लोकार्पण
* दलितांच्या सन्मान आणि अधिकारासाठी सरकार कटिबद्ध- नरेंद्र मोदी
* महिलांविरोधात गुन्हे करणार्‍यांना सोडणार नाही, अशा घटनांना चांगल्या नागरी समाजात स्थान मिळू शकत नाही- पंतप्रधान
* देश, समाज म्हणून अशा घटनांची लाज वाटते, कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, न्याय होणारच, मुलींना न्याय मिळणारच- पंतप्रधान
* उन्नाव बलात्कार प्रकरण: अलाहाबाद हायकोर्टाने ०२ मेपर्यंत मागवला अहवाल
* कठुआ बलात्कार पीडितेची ओळख उघड करणार्‍या प्रसारमाध्यमांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस
* सोशल मीडियावर कठुआ बलात्काराचं समर्थन करुन पीडित मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा‍‍र्‍याची कोटक महिंद्रा बँकेने केली हकालपट्टी
* कठुआ बलात्कार प्रकरण: आरोपींचा बचाव करणाऱ्या भाजपाच्या दोन मंत्र्यांचे राजीनामे
* कावेरी वाद: केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केल्याच्या आरोपाखाली गायक कोवनला अटक
* राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित:
* दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार
* श्रीदेवी यांना 'मॉम' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
* 'न्यूटन' ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
* 'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
* 'म्होरक्या' मराठी चित्रपटाला विशेष पुरस्कार
* नागराज मंजुळेंच्या 'पावसाचा निबंध' लघुपटाला पुरस्कार
* देशविघातक कारवाया केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले साईबाबांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ढकलली पुढे
* आधारच्या माध्यमात नागरिकांची गोपनीयता आणि त्यांची माहिती सुरक्षित ठेवा- सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची सूचना
* राजस्थानमधील भरतपूरमध्ये अल्पवयीन तरुणीवर तीन तरुणांचा बलात्कार, बलात्काराचा व्हिडीओ टाकला सोशल मीडियावर
* राष्ट्रकुल स्पर्धा: टेबल टेनिस महिला दुहेरीत मनिका बत्रा आणि मौर्ना दास जोडीला रौप्य पदक
* राष्ट्रकुल स्पर्धा: फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये पूजा धांडाला रौप्य पदक
* राष्ट्रकुल स्पर्धा: बॉक्सिंगमध्ये नमन तंवरला कांस्य पदक
* आयपीएलः रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची पंजाबवर ०४ गडी राखून मात
* वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलला 'खास' अतिरिक्त पाणी विकत देण्याची मुंबई पालिकेची तयारी
* पनामा पेपर्स प्रकरणात पदच्युत झालेले पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निवडणूक लढविण्यावर आजन्म बंदी


Comments

Top