HOME   महत्वाच्या घडामोडी

पत्रकार पैसे मागतात, व्यंगचित्रकारांचा दिवस, पुन्हा धुळीचे वादळ, धीरज देशमुख कर्नाटकात, शेतकर्‍यांचे पाणी परवाने रद्द होणार, सफाई कामगारांचा सत्कार, भाजपचा द्लित टुरिजम.....०५ मे २०१८

पत्रकार पैसे मागतात, व्यंगचित्रकारांचा दिवस, पुन्हा धुळीचे वादळ, धीरज देशमुख कर्नाटकात, शेतकर्‍यांचे पाणी परवाने रद्द होणार, सफाई कामगारांचा सत्कार, भाजपचा द्लित टुरिजम.....०५ मे २०१८

* पत्रकार समाजकारण शिकवतात अन दुसरीकडे पैसे मागतात- नितीन गडकरी
* आज जागतिक व्यंगचित्रकार दिन
* ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचं ७१ व्या वर्षी निधन
* आज पुन्हा उत्तर भारतात पुन्हा वादळाचा अंदाज
* लातूरचे युवा नेते धीरज देशमुख कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रचारात, भाजपाला हद्दपार करण्याचे आवाहन
* कामगार दिनानिमित्त लातूर मनपाने केला सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार
* लातूर जिल्ह्यात ठिबक किंवा तुषार पद्धती वापर न केल्यास पाणी परवाने होणार रद्द
* मागेल त्या वृद्ध कलाकारांना मानधन मिळवून देऊ- खा. सुनील गायकवाड
* चायनीज पदार्थांचे अती सेवन दम्याला निमंत्रण- बॉंबे हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा अहवाल
* भुजबळांना जामीन मिळाला पण आणखी आठ दिवस रहावं लागणार रुग्णालयात
* छगन भुजबळ जामीनावर बाहेर आल्यानंतर राजकारणात आधीपेक्षाही अधिक आक्रमकपणे सक्रिय होतील- निकटवर्तीयांचा दावा
* प्रकृती अस्वास्थ्यामुळं मिळाला भुजबळांना जामीन
* साक्षीदारावर दबाव आणता येणार नाही, मुंबई परवानगीविना सोडता येणार नाही, पासपोर्ट जमा करावा लागेल
* भाजपाच्या फायद्यासाठी भुजबळांना बाहेर काढलं गेलं- राज ठाकरे
* आरोप सिद्ध न होताही दोन दोन वर्षे कारगृहात काढावे लागतात हे दुर्दैवी- अजित पवार
* अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या फाइसची चोरी, महाव्यवस्थापक दत्तात्रय झोंबाडे निलंबित
* राज्यात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना सशर्त संरक्षण, सरकारच्या धोरणाचा निकाल हायकोर्टाने ठेवला राखून
* आगामी निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपशी पुन्हा बोलणी, जवळीक नाही- खासदार राजू शेट्टी
* प्लास्टिक बंदी लागू करण्याचा मध्य रेल्वेचाही निर्णय, तीन महिन्यात प्लास्टिक आवरण खाद्यपदार्थाचा साठा संपवा- रेल्वेचे स्टॉलधारकांना निर्देश
* भाजपालाही एक्स्पायरी डेट आहेच, भुजबळांना जामीन मिळण्यास सरकारमुळे उशीर– राज ठाकरे
* 'एक अधिकारी, एक राज्य, एक सरकारी घर, या सरकारी योजनेतून घर देण्यासाठी नियमात बदल करण्यास राज्य सरकार तयार
* कारखान्यांचे प्रश्न आणि साखरेचे विक्रमी उत्पादनाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्याचा साखर कारखानदारांचा निर्णय
* वारणा येथील ०९ कोटीच्या लूट प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सीआयडीकडून चौकशी
* तीन वर्षांच्या मुलीला घरी नेऊन अत्याचार, पुण्यातील भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
* ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन
* उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण, गोव्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेच्या तिन्ही 'सुपरफास्ट' एक्स्प्रेस
* दुर्बीण लावूनही राहुल गांधींना निवडणुकीतला विजय दिसणार नाही-अमित शाह
* 'दलित टुरिझम' ही भाजपची परंपरा नाही, बाहेरून जेवण आणल्याचे कोणीही सिद्ध करावे- उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा
* बाहेरून खाद्यपदार्थ आणून दलित कुटुंबाच्या घरी जेवण केल्याचा उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा यांच्यावर आरोप
* दलितांच्या घरी रात्रभर मच्छर चावतात, तरीही भाजपाचे नेते तिथे जातात- उत्तर प्रदेशच्या मंत्री अनुपमा जयस्वाल
* 'कचऱ्याचे शहर' असा उल्लेख करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूचा अपमान केला- राहुल गांधी
* कार्ती चिदंबरम यांची ब्लॅक मनी कायद्यांतर्गत चौकशी करण्यास मद्रास उच्च न्यायालयाची प्राप्तिकर खात्याला परवानगी
* अलिगढ मुस्लिम विद्यापीठात मोहंमद अली जीनांचे छायाचित्र लावण्यावरून वाद, जिल्ह्यातील इंटरनेटसेवा बंद
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग वर्षभरात आणखी तीन वेळा भेटणार
* न्यूयॉर्क शहरातील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर यांची नियुक्ती


Comments

Top