HOME   महत्वाच्या घडामोडी

शुक्रतारा निखळला-गायक दाते यांचं निधन, रिलॅक्सवर धाड, खा. गायकवाडांची आजलातूरला भेट, नाना-मकरंद लातुरात येणार, उद्यापासून ‘भुजबळ ब्रिगेड’ अ‍ॅक्टीव्ह, मतदारांचे हातपाय बांधा......०६ मे २०१८

शुक्रतारा निखळला-गायक दाते यांचं निधन, रिलॅक्सवर धाड, खा. गायकवाडांची आजलातूरला भेट, नाना-मकरंद लातुरात येणार, उद्यापासून ‘भुजबळ ब्रिगेड’ अ‍ॅक्टीव्ह, मतदारांचे हातपाय बांधा......०६ मे २०१८

* शुक्रतारा निखळला: ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईत राहत्या घरी निधन
* अरुण दाते यांचं खरं नाव होतं अरविंद दाते
* खा. सुनील गायकवाड यांनी दिली आजलातुरच्या नव्या कार्यालयाला भेट, नवव्या वर्धापनदिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
* लातुरच्या रिलॅक्स लॉजवर धाड, सज्ञान तरुण-तरुणीला घेतले शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात
* १२ तारखेला लातुरात १०० जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे येणार
* लातुरातील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी व्यापारी नागनाथअण्णा माशेट्टे यांनी दिली १०० मंगळसुत्रं, १०० जोडवी
* ‘लग्न मुबारक’ चित्रपटाला महाराष्ट्र विकास आघाडीचा विरोध, सामाजिक भावना दुखावण्याचा संभव
* उद्यापासून छगन भुजबळ होणार राजकारणात सक्रीय
* रुग्णालयात भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या प्रदीर्घ चर्चा
* भुजबळ उद्या शरद पवार यांची घेणार भेट, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
* जे मतदान करणार नाहीत त्यांचे हातपाय बांधून आणा, भाजपाला मतदान करायला लावा- येदीयुराप्पा
* पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या १३ 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळां'ची यादी जाहीर, औरंगाबाद विभागात शिराढोण आणि पाथरी तालुक्यातील माळीवाडा शाळांची निवड
* सोलापुरात अवैध वाळू नेणार्‍या ट्रकचा तहसीलदारांनी केला फिल्मी स्टाईलने पाठलाग पण ट्रक फरार
* पणजीत जून महिन्यात गोवा मराठी चित्रपट महोत्सव
* आज नीट परिक्षा, १३ लाख विद्यार्थी भविष्य आजमावणार
* मुख्यमंत्र्यांनी घेतला खरीप हंगामपूर्व आढावा
* प्लास्टीक, थर्माकोल उत्पादक, विक्रेते, वाहतूक आणि साठवणूकदार यांच्यावर केलेल्या कारवाईचा सादर करण्याचा आदेश
* कुपोषण निर्मूलनासाठी सरकारने केलेल्या उपायांची माहिती उच्च न्यायालयाने मागवली
* अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कसलीही शिथिलता आणली जाणार नाही- रामविलास पासवान
* उस्मानाबादच्या बेंबळीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन आरोपींना २२ वर्षांची सक्तमजुरी, एकाला २७ वर्षांची सक्तमजुरी
* शेतकरी स्वाभिमान यात्रा पोचली पैठणमध्ये, राजू शेट्टी यांनी केली सरकारी धोरणांवर टीका
* जळगावात तीन युवकांचा उष्माघाताने मत्यू, काल होते ४३ अंश सेल्सियस तापमान
* राज्यात दहावी आणि बारावीसाठी १७ क्रमांकाचा फॉर्म भरून परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना यावर्षी शेवटची संधी
* विद्यार्थ्यांना देता येणार 'मुक्त विद्यालय मंडळा'तर्फे परीक्षा
* भंडारा- गोंदियाची जागा राष्ट्रवादीच लढवणार, राहुल गांधींचा निर्णय मान्य - नाना पटोले
* भंडारा-गोंदिया पोटनिवडणुक: ०९ मे रोजी उमेदवाराच्या नावाची घोषणा - राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल
* जामखेड राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणातील मुख्य सूत्रधार उल्हास मानेला अटक
* सेनेला भाजपाबरोबर युती करण्याची इच्छा नाही, मात्र सेनेबरोबरची युती भाजपाची गरज, युती न झाल्यास भाजपाचे अस्तित्व संपेल- पृथ्वीराज चव्हाण
* अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी आफ्रिका, आशिया खंडातील विकसनशील देशांना पैशांऐवजी साखर पुरवा- शरद पवार
* राज्यात सप्टेंबर ते जानेवारी काळात ३१८ बालकांचा कुपोषणाने मृत्यू, समस्या सोडविण्याच्या सरकारच्या उदासीनतेवर उच्च न्यायालय नाराज
* उस्मानाबाद जिल्ह्यात महिलेवर सामुहिक बलात्कार करणार्‍या तिघांना २२ वर्षांची तर एकाला २७ वर्षांची सक्तमजुरी, प्रत्येकाला ५२ हजार दंड
* आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी नाम फाउंडेशनकडून १७ लाखांची मदत
* १० वी आणि १२ वी च्या निकालांच्या तारखा जाहीर नाहीत, सोशल मीडियावरील तारखांवर विश्वास ठेवू नका- शिक्षण मंडळ
* एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा, ते मंत्री झाल्यास आनंद, त्यांच्या अनुभवाचा पक्षाला, सरकारला फायदा - गिरीश महाजन
* बोरीवली-कोल्हापूर मार्गावर ११ मे पासून एसटीची स्लीपर कोच वातानुकूलित बस धावणार
* जनतेने ‘वन की बात’ केल्यामुळे वृक्ष लागवडीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर, हरित क्षेत्रात २७३ चौरस किलोमीटरची वाढ- सुधीर मुनगंटीवार
* दीड महिन्यांपासून गायब झालेल्या अंधेरीतील बड्या कंपनीतील अधिकारी कीर्ती व्यास यांच्या हत्येप्रकरणी दोन सहकाऱ्यांना अटक
* भिवंडी तालुक्यात पोलिस बंदोबस्तात बुलेट ट्रेनच्या जमिनीची संयुक्त मोजणी सुरू, सोमवारपासून दिवा परिसरातील सात गावांमध्ये होणार मोजणी
* सरकारचा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम येत्या जूनपासून जिल्हा परिषद शाळेत होणार सुरू
* १५ मे नंतर इंडियन नॅशनल काँग्रेसचे पंजाब, पुड्डुचेरी परिवारात रुपांतर होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* कर्नाटक विधानसभेच्या मतदानाला उरले सातच दिवस, आतापर्यंत १२० कोटींचा मुद्देमाल जप्त


Comments

Top