HOME   महत्वाच्या घडामोडी

गोव्यात कॉंग्रेसच सत्तेवर येणार- आ. अमित देशमुख

गोव्यात कॉंग्रेसच सत्तेवर येणार- आ. अमित देशमुख

पणजी: देशभरातील जनमत काँग्रेसच्या बाजूने आहे. विशेषत: गोव्यातील जनमत काँग्रेसच्या बाजूने असूनही आम्ही सतेपर्यंत पोहोचू शकलो नाही. सध्याचा लोकक्षोभ लक्षात घेता देशाची सत्ता काँग्रेसच्या हाती येईल आणि पर्यायाने गोव्यातील सत्ता काबीज करण्यासही काँग्रेसला वेळ लागणार नाही असा विश्वास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पणजी येथे व्यक्त केला. गोवा प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी मावळते अध्यक्ष शांताराम नाईक यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी पणजी येथे एका विशेष कार्यक्रमात गोवा राज्याचे प्रभारी तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो, खी नाईक, प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, काँग्रेसचे गुजरात राज्याचे प्रभारी राजीव सातव, गोव्यातील काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top