HOME   महत्वाच्या घडामोडी

महाशक्तीच्या यादीत भारत २५ वा, अजित पवारांनी वाचवले अनेकांचे प्राण, रेल्वेचालकांचा संप, कार्यालये मराठीत चालवा, शेतकर्‍यांचा जेलभरो.....०९ मे २०१८

महाशक्तीच्या यादीत भारत २५ वा, अजित पवारांनी वाचवले अनेकांचे प्राण, रेल्वेचालकांचा संप, कार्यालये  मराठीत चालवा, शेतकर्‍यांचा जेलभरो.....०९ मे २०१८

* महाबळेश्वर पाचगणी घाटात अपघात, अहित पवार यांनी केली जखमींना मदत, रुग्णालयात पोचवले
* मुख्यमंत्र्यांचा तडीपार गुंडासोबत फोटो व्हायरल
* पुण्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांना मिळाले कूल जॅकेट्स
* मुंबईत रेल्वेमनचे तीन दिवसांचे उपोषण, अन्य संघटनांचा पाठिंबा
* डीएसके आणि त्यांच्या पत्नीच्या हातात लागली गुन्हेगाराची पाटी
* आंबेड्करवादी कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवणे अयोग्य- रामदास आठवले
* नधिकृत बांधकामांना परवाने दिल्याबद्दल मनपातील संबंधईतांच्या वेतनवाढी रोखल्या
* मांजराच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून अनधिकृत पाणी उपसा करण्यास मनाई, मोटारी जप्त करणार
* जिल्हा परिषदेने केल्या खुल्या प्रवर्गातील शिक्षकांच्या बदल्या
* उदगीर कर्नाटक सिमेवर दोन लाख रुपये किमतीची विदेशी दारु जप्त
* रेल्वे परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांचे निधन
* सरकारी कार्यालयांमध्ये इंग्रजीचा वापर पूर्णपणे थांबवून 'मराठीतच लिहिण्याचा, बोलण्याचा' राज्य सरकारचा निर्णय
* सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर सक्तीचा करणारे परिपत्रक जारी, देखरेखीसाठी प्रत्येक विभागात एक 'दक्षता अधिकारी' नियुक्त
* कांदिवली येथील शिवसेना उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांच्या हत्येप्रकरणी ०२ जणांना अटक, १४ मेपर्यंत पोलीस कोठडी
* काँग्रेसचे राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश , पालघरमधून गावित यांना उमेदवारी- मुख्यमंत्री
* पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारी अर्जावेळी सेनेचं शक्तीप्रदर्शन
* भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक भाजपची माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी
* सहकारी व खाजगी दूध पावडर उत्पादकांना प्रति लिटर दुधामागे तीन रुपये अनुदान- राज्य मंत्रिमंडळ
* दूध उत्पादक महासंघांची लिटरमागे सात रुपयांची लूट, सरकार व महासंघांनी लुटले सात हजार कोट- सुकाणू समिती
* भुकटीसाठी ३३ कोटींचे अनुदान देऊन शेतकऱ्यांना फ़सविले, राज्यातील दोन लाख शेतकर्‍यांचे १४ मे रोजी जेलभरो
* पोलिस भरतीसाठी मुंबईत आलेल्या चार महिला उमेदवार कारच्या धडकेत जखमी, कार चालकाला अटक
* काँग्रेसचे रणजीत देशमुख यांची मुलगा अमोल देशमुख विरोधात तक्रार, बळजबरी घरात घुसून राहत असल्याचे म्हणणे
* शिवसेनेची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा म्हणजे फक्त संधीसाधुपणाचे राजकारण- संजय निरुपम
* वांद्रे टर्मिनस-निजामुद्दीन गरीबरथ या एक्स्प्रेसमध्ये चहा-कॉफीसाठी टॉयलेटचे पाणी वापरणार्‍या कंत्राटदारास एक लाखाचा दंड
* चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्स्प्रेस गाडीत पाण्याच्या बाटल्या थंड करण्यासाठीचा बर्फ टॉयलेटमध्ये ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल
* रेल्वेच्या तपास मोहिमेत गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये चहा-कॉफीसाठी टॉयलेटचे पाणी वापरल्याचे उघड
* नगर जिल्ह्यात जंगलाला लागलेल्या आगीत सुमारे तीन हजार हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक
* यवतमाळ येथे पाणीटंचाईनं त्रस्त ग्रामस्थांचा पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर मोर्चा
* मोदी अभिनेत्यासारखं बोलतात, त्यांच्या भाषणांनी लोकांचं पोट भरलं असतं तर आनंद झाला असता. पण भाषणांनी पोट भरत नाही- सोनिया गांधी
* मोदींवर काँग्रेस मुक्त भारताचे भूत बसले आहे, काँग्रेस मुक्त भारत तर सोडाच ते आपल्यासमोर कोणालाच सहन करू शकत नाहीत - सोनिया गांधी
* नरेंद्र मोदी फक्त मन की बात करतात, पण देशातील जनतेला काय सांगायचे आहे हे ऐकत नाहीत- राहुल गांधी
* एखाद्या नेत्याचे जाहीर कौतुक करणे म्हणजे युती नव्हे- अमित शाह, ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत
* राहुल गांधी देवेगौडांचा अपमान करतात, याकडे मोदींनी लक्ष वेधले, पण मोदींनी देवेगौडांचे कौतुक केल्याचे वारंवार सांगितले जाते- अमित शाह
* पंतप्रधान वयवंदना योजनेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता, ज्येष्ठ नागरिकांना गुंतविता येणार जास्तीत जास्त १५ लाख
* आशिया पॅसिफिक जागतिक महाशक्ती २५ देशांच्या सूचीत भारत चौथ्या क्रमांकावर
* ब्रिटनमध्ये भारतीय बँकांनी दाखल केलेला १० हजार कोटींचा खटला विजय मल्ल्या हरला- ब्लूमबर्ग वृत्तसंस्था


Comments

Top