HOME   महत्वाच्या घडामोडी

पालकमंत्र्यांचे जलभूमी अभियान सुरु, ज्यांनी बांधलं महाराष्ट्र सदन सुंदर, तेच गेले अंदर.......११ मे २०१८

आता शहरात पडणारे पाणी शहरातच, शरद पवारांची आघाडीची मोळी, मांसबदी-नोटाबंदी नंतर नसबंदी, टिळक दहशतवादी

पालकमंत्र्यांचे जलभूमी अभियान सुरु, ज्यांनी बांधलं महाराष्ट्र सदन सुंदर, तेच गेले अंदर.......११ मे २०१८

* पालकमंत्र्यांचे जलभूमी अभियान सुरु, ज्यांनी बांधलं महाराष्ट्र सदन सुंदर, तेच गेले अंदर.......११ मे २०१८
* पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी सुरु केले इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राज्यात पहिल्यांदा
* लातुरातील रिसॉर्टमध्ये घेतली सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, जलतज्ञ, अधिकार्‍यांची बैठक
* जलशिवारमध्ये शिवाराचे पाणी अडवले, आता शहरात पडणारे पाणी शहरातच मुरवायचे
* ऊस उत्पाद्कांची देणी चुकती करण्यासाठी साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्याचे केंद्राचे आदेश
* शेती आणि शेतकरी देशाच्या प्राधान्याचा विषय, तो बॅंकांचाही प्राधान्याचा विषय व्हावा- मुख्यमंत्री
* १९७ हरभरा खरेदी केंद्रांवर ४०५९८ शेतकर्‍यांकडून ५ लाख ५ पाच हजार ८६१ क्विंट्ल खरेदी
* बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी न्यायालयात कॅव्हेट दाखल करावे लागणार
* मुंबईसह राज्यात समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवणार- शरद पवार
* मुलाच्या लग्नासाठी लालूप्रसाद यादव यांना मुलाच्या लग्नासाठी मिळाला पॅरोल
* छगन भुजबळ यांची महत्वाच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट, राजकीय घडामोडींना वेग
* नाशिकच्या छापखान्यात पाचशे रुपयांच्या ४० हजार कोटी नोटा छापल्या
* ३८ दिवस चाललेली आधार कार्डावरील सुनावणी संपली, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवली
* ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश परिक्षांना सुरुवात
* विश्व मराठी साहित्य संमेलन होणार अबुधाबीत
* महावितरणने पाठविले आठ लाखांचं वीज बील, औरंगाबादेत भाजी विक्रेत्याची आत्महत्या
* पंतप्रधानांचा दोन दिवसांचा नेपाळ दौरा
* ज्यांनी बांधलं महाराष्ट्र सदन सुंदर, तेच गेले अंदर- भुजबळांची मिष्किली
* छगन भुजबळ यांना केईएममधून डिस्चार्ज, तब्येत सुधारल्यावर जोमाने कामाला लागेन, असत्याचे ढग दूर होऊन सत्य समोर येईल- छगन भुजबळ
* वयोमान आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळांना पूर्वीसारखे दौरे तसेच काम न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
* रिझव्‍‌र्ह बँकेच्या नोटांचा छापखाना कोल्हापुरातच असे वाटायला लागले आहे- आमदार हसन मुश्रीफ
* कोल्हापूर महापालिका नगरसेवक फोडाफोडी, कुरुंदवाड नगरपालिकेत झालेल्या घोडेबाजारामुळे मुश्रीफ यांची टिका
* मोदी सरकारने मांसबंदी, नोटबंदी केली, पुन्हा सत्तेवर आल्यावर नसबंदी केल्याविना राहणार नाहीत- धनंजय मुंडे
* राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगलीत आ. जयंत पाटील यांचा मुंडे यांच्या हस्ते नागरी सत्कार
* अंधेरीतील बड्या पदावर असलेल्या कीर्ती व्यासची हत्या, वडाळ्यातील नाल्यातील मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोन, माच्छिमारांची मदत
* कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेच्या हत्येचा आरोप असलेल्या तिघांच्या जामीनावर निर्णय देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
* बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टी प्रकल्पाला केंद्राकडून पाच कोटींचा निधी
* कर्नाटक विधानसभा निवडणुक: प्रचार थंडावला, २२४ पैकी २२३ जागांसाठी १२ मे रोजी मतदान, मतमोजणी १५ मे रोजी
* प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रोड शो, प्रचार सभा, पत्रकार परिषदेने उडाला प्रचाराचा धुरळा
* दोन्ही प्रमुख पक्षांचे जिंकण्याचे दावे, जनमत चाचण्यांमध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता
* बाळ गंगाधर टिळक दहशतवादाचे जनक, राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात
* रिलायन्स जिओचा पोस्टपेड यूजर्ससाठी नवा प्लॅन, १५ मे पासून इंटरनॅशनल कॉल ५० पैसे प्रति मिनिट
* कच्च्या तेलाच्या दरात होणारी वाढ आणि आयातदारांकडून डॉलरची मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी यामुळे रुपयाची घसरण
* मलेशियात ९२ वर्षाच्या हुकूमशहा महाथिर महंमद यांनी पंतप्रधानपदाची घेतली शपथ


Comments

Top