HOME   महत्वाच्या घडामोडी

पत्रकारांना प्रवेशबंदी, मासेमारीमुळं पाणी पिवळे, मतदान सुरळीत, उमेदवार अशोक जगदाळे लातुरात, आज पेट्रोल सर्वात महाग, पत्रकारांची मते बाद........२१ मे २०१८

पत्रकारांना प्रवेशबंदी, मासेमारीमुळं पाणी पिवळे, मतदान सुरळीत, उमेदवार अशोक जगदाळे लातुरात, आज पेट्रोल सर्वात महाग, पत्रकारांची मते बाद........२१ मे २०१८

* लातुरात विधानपरिषदेच्या मतदानाला सुरुवात, उमेदवार अशोक जगदाळे जातीने हजर
* विधानपरिषद मतदान केंद्रात पत्रकार आणि माध्यमांना पोलिसांनी प्रवेश नाकारला, म्हणे उस्मानाबाद जिल्हाधिकार्‍यांचे आदेश!
* लातूर कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पाच पाच जणांच्या समुहाने जाऊन केले मतदान
* लातुरात कॉंग्रेस जिल्हा परिषद सदस्यांनी आधी केले मतदान
* सहलीवरची पाखरं लातुरच्या जवळ थेट मतदान केंद्रावर उतरणार
* लातुरात आज पेट्रोल ८५.११ तर डिझेल ७१.८३ रुपये, आजवरची सर्वात मोठी वाढ
* लातुरच्या पत्रकारांच्या निवडणुकीत एक मतपत्रिका झाली गहाळ, तेरा मते ठरली बाद
* लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरसिंह घोणे, सचिवपदी सचिन मिटकरी
* धरणातील मासेमारीमुळे लातुरला मिळते पिवळे पाणी- विक्रांत गोजमगुंडे
* मासेमारीसाठी वापरल्या जाणार्‍या केमिकलसाठी पाणी तपासणी करणार- आयुक्त दिवेगवकर
* हेर येथे धावता ट्रक पेटल्याने लाखोंचे साहित्य खाक
* अंगणवाडीतच बालकांना मिळणार आधार कार्ड, लातूर प्रशासनाचा निर्णय
* लातूर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दारुविक्रीत दुपटीने वाढ
* मांजरा धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून सोडले पाणी
* कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी लिंगायत नेत्याला संधी द्या, वीरशैव महासभेची मागणी
* औरंगाबादच्या प्रा. मनिषा वाघमारे यांनी केलं एव्हरेस्ट सर
* ५२ टक्के अलुतेदार-बलुतेदारांना विधानसभेत पाठवणार- प्रकाश आंबेडकर
* जगातील सर्वात श्रीमंत देश अमेरिकाच, आपल्या स्थानावर कायम, भारत सहावा
* न्या. लोया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल
* मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे हाल
* शिवसेनेनं पुढाकार घेतल्याशिवाय युती होणार नाही- सुधीर मुनगंटीवार
* स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा मतदारसंघांसाठी आज मतदान
* बीडच्या काकू-नाना आघाडीच्या ११ अपात्र नगरसेवकांचं मतदान ग्राह्य धरु नये, खंडपिठाचे आदेश
* छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सात जवान शहीद, नक्षल्यांनी शस्त्रसाठाही लुटला
* आज दहशतवादविरोधी दिन, राजीव गांधींची पुण्यतिथी
* पेट्रोलच्या दरात ३३ तर डिझेलच्या दरात ३६ पैशांनी वाढ
* एसटी कधी येणार ते लगेच कळणार, दिवाळीपासून बसेसना बसवणार व्हेईकल ट्रेकींग सिस्टीम
* कर्नाटकात एका कामगाराच्या शेडमध्ये सापडल्या व्हीव्हीपॅट मशिन्स
* यापुढे गांधी जयंतीदिनी रेल्वेत प्रवाशांना मांसाहारी भोजन न देण्याचा निर्णय
* मोदींना टक्कर देण्याची क्षमता मनमोहनसिंगात, राहूल गांधींचे अजून राजकीय शिक्षण बाकी- प्रकाश आंबेडकर
* शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी घेतली छगन भुजबळ भेट, दोन तास चर्चा
* नागपूरच्या वाटर पार्कमध्ये बुडून दोघांचा मृत्यू
* भाजी विक्रेत्यावर दादागिरी, किरीट सोमय्या यांच्याविरुध्द गुन्हा दाखल
* पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार रशिया दौर्‍यावर
* दिल्लीत होतात रोज दोन बलात्कार: पाहणी अअहवालाचा निष्कर्ष
* किशोरकुमार यांचं खंडवा येथील वडिलोपार्जित घर विकलं साडेचौदा कोटींना
* कानपुरात विषारी दारुने घेतले ११ बळी
* नीरव मोदी विरोधात लवकरच जारी होणार रेड कॉर्नर नोटिस
* औरंगाबादेतील दंगलग्रस्तांना शिवसेनेनं दिली साडेआठ लाख रुपयांची मदत
* कर्नाटक मंत्रीमंडळ विस्तारासाठी कुमारस्वामी दिल्लीत घेणार राहूल गांधी यांची भेट
* जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल छगन भुजबळ यांनी मानले आभार


Comments

Top