HOME   महत्वाच्या घडामोडी

पालकमंत्र्यांचं अभिवादन, आज आयपीएलचा शेवट, आमदारांना बडवू, फडणवीस म्हणतात तो आवाज माझाच, अतिरेक्यांनी पळवल्या पोलिसांच्या रायफली, कर्नाटकत वाजलं भांडं.....२७ मे २०१८

पालकमंत्र्यांचं अभिवादन, आज आयपीएलचा शेवट, आमदारांना बडवू, फडणवीस म्हणतात तो आवाज माझाच, अतिरेक्यांनी पळवल्या पोलिसांच्या रायफली, कर्नाटकत वाजलं भांडं.....२७ मे २०१८

* भोईसमुद्रगा येथे शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी झाला रास्ता रोको
* सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी ०१ जूनपासून राष्ट्रीय किसान महासंघ भाजी आणि दूध पुरवठा बंद करणार
* सीबीएसईच्या बारावीच्या परिक्षेत लातुरच्या संत तुकाराम विद्यालयाचा निकाल लागला ९७ टक्के
* प्रा. शिवाजी जवळगेकर यांच्या ‘आखाडा’ काव्यसंग्रहाचे आ. दिलीपराव देशमुख यांनी प्रकाशन
* आमचे प्रश्न विधीमंडळात न मांडल्यास आमदारांना चाबकाने बडवू, छावा मराठा संघटनेचा इशारा
* लोकनेते विलासराव देशमुख यांना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले अभिवादन
* इंधन सतत महाग, एसटीलाही करावी लागेल भाडेवाढ- दिवाकर रावते
* भाजपाविरोधी देशव्यापी आघाडीत शिवसेना असणार नाही- कॉंग्रेसचे प्रवक्ते मनू संघवी
* मोदी सरकारविरोधात औरंगाबादेत निदर्शने, नांदेडमध्ये निघाला मूक मोर्चा
* शेतकर्‍यांच्या कर्जासाठी जालना जिल्ह्यात मिळणार १४६८ कोटी
* निलंग्यात जलयुक्त आवार योजनेसाठी पालकमंत्र्यांनी काढली स्वावलंबन यात्रा
* मोदी सरकारमुळे सामान्यांचे जगणे सुखकर झाले- खासदार सुनील गायकवाड
* नांदेडच्या पोलिस भरती घोटाळा प्रकरणी सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातून चौघांना अटक
* आज आयपीएलचा मुंबईच्या स्टेडियमवर शेवटचा सामना
* आज पुन्हा पेट्रोल १५ तर ढिझेल १७ पैशांनी वाढले, दर कमी करण्याची केवळ घोषणा अमलबजावणी शून्य
* आम्ही जनपथावरुन नाही तर जनमतावरुन सरकार चालवतो- पंतप्रधान
* व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप माझीच होती, पण सेनेनं ती एडीट केअरुन अर्धवट ऐकवली हा गुन्हा- मुख्यमंत्री
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत संपूर्ण ऑडिओ क्लिप सर्वांसमोर सादर केली
* शिवसेनेशी युती न झाल्यास कॉंग्रेस सत्तेत येऊ शकते, एकत्र येण्यात सामान्यांचे हित- चंद्रकांत पाटील
* इंधन जीएसटीत आणण्यास रामदास आठवले यांनी आधी केला विरोध, चूक लक्षात येताच केले समर्थन
* रायगड पायी सर करण्याचे खा. संभाजीराजे यांचं पंतप्रधानांसह आमीरखान, रितेश देशमुख यांना आवाहन
* अनंतनागमध्ये दोन पोलिसांच्या रायफली घेऊन अतिरेकी पसार
* भांडं वाजलं: कर्नाटकात खातेवाटपावरून काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद
* औरंगाबादेत छावा मराठा संघटनेचे ११ वे राष्ट्रीय अधिवेशन २९ मे रोजी, हार्दिक पटेल येणार
* सचिन तेंडुलकरने औरंगाबाद विमानतळावर इंधन भरले, नागपूरला रवाना
* भ्रष्टाचारविरोधी कारवाईमुळे मित्रही झाले शत्रू- पंतप्रधान
* औरंगाबादेतील दंगलग्रस्त भागाची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली पाहणी
* सरकारने चार वर्षात केली केवळ जाहिरातबाजी, भ्रष्टारामुक्ती झालीच नाही- अण्णा हजारे
* सीबीएसई टॉपर मेघना श्रीवास्तव वर्षभर दूर राहिली सोशल मिडियापासून!
* आगामी निवडणुका शिवसेना-भाजपा एकत्रच लढवणार- अमित शहा
* मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण, कॉंग्रेसनं दिल्लीत साजरा केला ‘विश्वासघात दिन’


Comments

Top