logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   महत्वाच्या घडामोडी

शाह-ठाकरेंच्या भेटीवर नजरा, ३३ तंबाखूपटूंना दोनशेचा दंड, तूर-हरभर्‍याला एक हजार, वजनदार प्रवाशांना दंड, कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तार, मथुरेत दारुबंदी........०६ जून २०१८

शाह-ठाकरेंच्या भेटीवर नजरा, ३३ तंबाखूपटूंना दोनशेचा दंड, तूर-हरभर्‍याला एक हजार, वजनदार प्रवाशांना दंड, कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तार, मथुरेत दारुबंदी........०६ जून २०१८

* आज लातुरच्या बार्शी मार्गावर शिवराज्याभिषेक सोहळा
* लातूर शहरात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत सव्वा लाखाचा गुटखा जप्त
* हिंगोलीहून दरोड्यासाठी चाकुरात आलेल्या सहाजणांना अटक, शस्त्रेही जप्त
* औसा बाजार समितीत शेतकरी-हमाल भवनचे खा. चंद्रकांत खैरे यांनी केले लोकार्पण
* लातुरच्या विविध सरकारी कार्यालयात तंबाखूचे सेवन करणार्‍या ३३ कर्मचारी आणि नागरिकांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड
* लातूर जिल्ह्यात चार लाख ३१ हजार झाडे लावणार, सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १७ तारखेला शुभारंभ
* रुफ वाटर हार्वेस्टींगसाठी लातुरातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करणार- पालकमंत्री पाटील
* लातुरच्या सरकारी दवाखान्यात बाळंतीणीच्या आत्महत्येची चौकशी करा, आ. निलम गोर्‍हे यांची मागणी
* अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचार्‍यांना कायद्यानुसार पदोन्नती मिळणार- सर्वोच्च न्यायालय
* ३१ मे पूर्वी नोंदणी झालेल्या पण खरेदी न झालेल्या तूर आणि हरभर्‍याला सरकार देणार प्रति क्विंटल एक हजार देणार
* राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारने केली ६२५ कोटी रुपयांची तरतूद
* जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करण्याबाबत समिती गठीत
* रेल्वेतून ठरलेल्या वजनापेक्षा अधिक वजनाचे सामान नेणार्‍या प्रवाशांना होणार दंड
* २०२२ पर्यंत समाजातील सर्व बेघर घटकांना मिळणार हक्काची, पक्की घरे- पंतप्रधान
* पंतप्रधान आवास योजनेसाठी पैसे मागणार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांक्डे तक्रार करा- पंतप्रधान
* माजलगाव बाजार समितीत १६५० शेतकर्‍यांचा हरभरा भिजला पावसात
* डाक सेवा कर्मचार्‍यांच्या संपाचा आज १६ वा दिवस
* शिवसेनेनं ताकद दाखवली तेव्हाच अमित शहांना मातोश्री आठवले- संजय राऊत
* भाजपाध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी सहा वाजता घेणार उद्धव ठाकरेंची भेट
* आज कर्नाटकात मंत्रीमंडळ विस्तार, काँग्रेसचे २२ आणि जेडीएसचे १२ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार
* येत्या ८ ते १० जून दरम्यान उंबईत अतिवृष्टीचा इशारा, मुंबईची तुंबई होणार
* श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा जिल्ह्यातील बरसाना, गोकुळ, गोवर्धन, नांदगाव आणि बलदेव येथे दारूबंदी
* मान्सूनपूर्व रेल्वेचा कोकण रेल्वेवर परिणाम. कोकणात जाणाऱ्या सगळ्या ट्रेन तासभर उशीराने धावत आहेत
* 'समर्थनासाठी संपर्क' उपक्रमाअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रतन टाटा, अभिनेत्री माधुरी दीक्षित, लतादिदिंना भेटणार
* एअरसेल -मॅक्सिस प्रकरण: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची ईडीच्या ऑफीसमध्ये सहा-साडेसहा तास चौकशी
* महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची निवड
* डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला अटकपूर्व जामीन फेटाळला, शरण येण्याचे आदेश
* सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी शशी थरुर यांना समन्स, ७ जुलैपूर्वी कोर्टात हजर राहण्याचे आदेश
* राफेल करारात एका पैशाचाही घोटाळा झालेला नाही- संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन
* पालघरच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग केल्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार
* अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांची बिटकॉइन घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू
* मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर डॉ. दीपक सावंत यांची कॅबिनेट बैठकीस हजेरी
* कच्छमध्ये कोसळलेल्या विमानाचे वैमानिक एअर कमांडर संजय चौहान यांचा मृत्यू


Comments

Top