HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरात धर्मसभा, मातोश्रीपासून दानवे दूर, लातुरात तासभर उत्तम पाऊस, काला प्रदर्शित, ठाण्यात आली इलेक्ट्रीक बस, कर्जे महागणार......०७ जून २०१८

लातुरात धर्मसभा, मातोश्रीपासून दानवे दूर, लातुरात तासभर उत्तम पाऊस, काला प्रदर्शित, ठाण्यात आली इलेक्ट्रीक बस, कर्जे महागणार......०७ जून २०१८

* लातुरच्या कॉक्सिट महाविद्यालयात १२ व १३ जून रोजी विप्रो कंपनीच्या कॅंपस मुलाखती
* १० जून रोजी लातुरात धर्मसभेचे आयोजन
* सुट्या खोबरेल तेलापैकी ८५ टक्के तेल भेसळयुक्त, कन्झ्युमर व्हॉईसच्या पाहणातील निष्कर्ष
* मुदतवाढ मिळाल्याने लातूर जिल्ह्यात हरभरा खरेदी सुरु
* लातूर जिल्ह्यात खते आणि बियाणांची साठेबाजी होऊ नये यासाठी ११ भरारी पथके नियुक्त
* लातूर मनपाने विकासाचा २१ कोटी रुपयांचा निधी खर्च न केल्याने परत करण्याचे शासनाचे आदेश
* आजपासून सहा दिवस राज्यात अतिवृष्टी, हवामान खात्याचा इशारा
* मातोश्रीवरील शहा-ठाकरे भेटीपासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ठेवण्यात आले दूर
* ठाकरे-शहा बैठक चालली सव्वा दोन तास, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंद दाराआड!
* झाले गेले विसरुन जाण्याची विनंती शहांनी ठाकरेंना केल्याची चर्चा
* १५ जूनपासून एसटीचा प्रवास १८ टक्क्यांनी महागणार
* डिझेल दरवाढीमुळे एसटीवर ४६० कोटींचा ताण
* ऊस उत्पादकांची थकित रक्कम देण्यासाठी केंद्राने कारखान्यांना दिले ८५०० कोटींचे पॅकेज
* रावसाहेब दानवेंनी जिल्हा दोन्ही हातांनी लुटला- अर्जून खोतकर
* रजनीकांतचा बहुचर्चित ‘काला’ चित्रपट सकाळी सहा वाजता प्रदर्शित
* इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा केंद्राचा निर्णय, सवलती देणार
* टपाल खात्याच्या ग्रामीण कर्मचार्‍यांच्या वेतनात ५६ टक्क्यांची वाढ
* रिझर्व बॅंकेने रेपो रेट वाढवला पाव टक्क्याने, कर्जे महागणार
* शंभर टक्के प्लास्टीकबंदी करणार्‍या मनपांना २५ तर नगरपालिकांना १५ लाखांचे बक्षीस
* अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात गोदामांचे नवे जाळे उभारणार- सहकार मंत्री
* शिवराज्याभिषेक कार्यक्रमानंतर रायगडावर चेंगराचेंगरी, उस्मानाबादच्या तरुणाचा मृत्यू
* मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
* नाशिकहून देवदर्शन करुन परतताना झालेल्या अपघातात कल्याणचे १० भाविक ठार
* पाण्याच्या प्लास्टीक पाऊचवर बंदी घालणार्‍या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान
* ठाणे शहर वाहतूक यंत्रणेत दाखल झाली पहिली इलेक्ट्रीक बस, झाले लोकार्पण
* माध्यमांनी दलित शब्द वापरायचा की नाही? प्रेस कॉन्सिलने निर्णय घ्यावा- उच्च न्यायालय
* शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ


Comments

Top