logo
news image औरंगाबादेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणार्‍या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने दिला चोप news image मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी news image अटलजींनी केला अलविदा, अंत्यसंस्कार झाले news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

HOME   महत्वाच्या घडामोडी

भय्युजी महाराज यांची आत्महत्या, विधानपरिषद निवडणुकीत सुरेश धस विजयी, बसमध्ये खून, निवडणुकीत राष्ट्रवादीला जात आठवते.......१२ जून २०१८

भय्युजी महाराज यांची आत्महत्या, विधानपरिषद निवडणुकीत सुरेश धस विजयी, बसमध्ये खून, निवडणुकीत राष्ट्रवादीला जात आठवते.......१२ जून २०१८

* अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी इंदौरच्या घरी डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
* आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरु नये- भय्युजी महाराज
* आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोटही सापडली
* भय्युजी महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, इंदौर कॉंग्रेसची मागणी
* सर्वच राजकीय पक्षांनी केला भय्युजी महाराजांच्या निधनावर शोक व्यक्त
* भय्युजी महाराजांनी तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज
* भय्युजी महाराजांनी नाकारलं होतं मंत्रीपद
* लातूर-बीड-उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस विजयी
* विधान परिषदेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली
* मतमोजणी सुरु असताना धस आणि राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांच्यात बाचाबाची, काही काळ मतमोजणी थांबली
* अशोक जगदाळे यांनी केली फेर मतमोजणीची मागणी
* या निवडणुकीत ठरली २५ मते बाद, मतपत्रिकेवर लिहिले होते सांकेतिक आकडे
* घड्याळ घातलेल्या ‘हातांनी’ मला विजयी केले, त्यांची नवरी मंडपातून पळून गेली- सुरेश धस
* कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, विश्वासघात केला- अशोक जगदाळे
* संभाजी भिडे म्हणजे आजचे बाजीप्रभू- शिवसेना
* राज्यातील १२ सनदी अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
* पुण्याच्या खेडमध्ये चालत्या बसमध्ये कोयत्याने वार करुन तरुणाचा खून
* ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात काम करण्यासाठी डॉक्टरांना आकर्षित करा- न्यायालय
* राज्यातील शिक्षक बदलीची प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्ण करा- पंकजा मुंडे
* पुराचे पुर्वानुमान काढण्याची यंत्रणा पुढील महिन्यात होणार कार्यान्वीत
* १७ जुलैपासून दहावी, बारावीची पुरवणी परिक्षा
* २१ जूनच्या योगदिनी युवकांसाठी कार्यक्रमांचं आयोजन केले जाणार
* माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एम्स रूग्णालयात दाखल
* तेरणा साखर कारखाना सुरु करा, मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर निघाला मोर्चा
* आज जागतिक बाल कामगार दिन, आजपासून बाल मजुरी विरोधी सप्ताह
* गाडी घेतली म्हणजे कुठेही पार्क करता का? उच्च न्यायालय संतापले!
* राहूल गांधी आज दोन दिवसांसाठी मुंबईत, भाजपच्या घेटाळ्यावरील पुस्तिकेचं प्रकाशन
* उद्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार
* निवडणुका आल्या की राष्ट्रवादीला जात आठवते- चंद्रकांत पाटील
* सर्वांच्या ऑफर्स आल्यावर बघू, तिसर्‍या आघाडीच्या निमंत्रणावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
* जम्मू-काश्मीरात व्हाट्स अप कॉलिंग बंद होणार
* १३ जूनला दिल्लीत काँग्रेसची इफ्तार पार्टी
* बिटकॉईन फसवणूक प्रकरणात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल
* संघ-भाजपने भारताला गुलाम केलंय; राहुल गांधी
* संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे ७ जुलै रोजी पुण्यात आगमन
* डी मार्टकडून कसलीही ऑफर नाही, सोशल मिडियावरील अपप्रचाराबाबत खुलासा
* बीड येथे नदीमध्ये पुरुषोत्तम पुरीकडे जाणारी बोट बुडाली, स्थानिकांनी वाचवले भाविकांना
* यंदा राज्यात ०१ ते ३१ जुलै या काळात १३ कोटी वृक्ष लागवड करणार
* नोटाबंदीच्या आधीपेक्षा सध्या रोख व्यवहार १८ टक्क्यांनी वाढले, कॅशलेसचे स्वप्न भंगले
* नीरव मोदी इंग्लंडची शरणागती पत्करणार, तिथलेच नागरिकत्व स्विकारणार
* पेट्रोल डिझेलला जीएसटी लागू करा, भाव कमी होतील- पी. चिदंबरम
* भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाची आज सांगता
* १४ जून पासून दोन दिवस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर
* आपल्या शेतातील आंबा खाल्ल्यास मुलगाच होईल, भिडे गुरुजींचे वक्तव्य, त्यांच्यावर गर्भलिंग कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
* मंत्रालयाच्या गेटसमोर बबन यशवंत झोटे यांनी केला अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
* ‘सैराट’चा हिंदी अवतार 'धडक'चा ट्रेलर प्रदर्शित


Comments

Top