logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   महत्वाच्या घडामोडी

भय्युजी महाराजांना अखेरचा निरोप

मुलीने दिला अग्नी, अंत्यविधीला बड्या व्यक्तींचा अभाव, अंत वादग्रस्त

भय्युजी महाराजांना अखेरचा निरोप

इंदौर: अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी आज जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले. कन्या कुहूने त्यांना अग्नी दिला. भय्युजींची कारकिर्द उज्वल असली तरी अंत वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. एका अज्ञात महिलेला हॉटेलात भेटणे, त्यांच्या मोबाईलवरील कॉल्स आणि अन्य डेटा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा नव्हता. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असे कोणीही मानायला तयार नाही. कारण त्यांच्या एका इशार्‍यावर अब्जावधी रुपये येऊन पडले असते. त्यांचा अंत सामान्यपणे अतार्किक आणि अबोध मानला जात आहे.
देशभरात एवढं वजन असणार्‍या भय्युजींच्या अंत्यविधीला फारशी बडी मंडळी हजर नव्हती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माणूस पाठवून दिला होता. पंकजा मुंडे, अंबादास दानवे उपस्थित होते. रामदास आठवले यांनीही अंत्यदर्शन घेतले. भय्युजी महाराज यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या डेटाबद्दल पोलिस बोलायला तयार नाहीत. कौटुंबिक कलहातून त्यांनी जीवनयात्रा संपवली असे दखवण्याचा प्रयत्न केला जात आहे असाही संशय व्यक्त केला जात आहे.


Comments

Top