HOME   महत्वाच्या घडामोडी

गोलाईतल्या कचर्‍याला रात्रीचा मुहूर्त, आज रेस थ्री, उद्या लाईफ लाईन लातुरात, खडसे भाजपातच, विठ्ठल चरणी अडीच कोटी, पेट्रोल स्वस्त......१५ जून २०१८

गोलाईतल्या कचर्‍याला रात्रीचा मुहूर्त, आज रेस थ्री, उद्या लाईफ लाईन लातुरात, खडसे भाजपातच, विठ्ठल चरणी अडीच कोटी, पेट्रोल स्वस्त......१५ जून २०१८

* लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शैलेश गोजमगुंडे यांची बिनविरोध निवड
* गंजगोलाई आणि तिला जोडणार्‍या सर्व रस्त्यांचा कचरा आता रात्री उचलणार
* लाईफ लाईन एक्स्प्रेस अर्थात रेल्वे हॉस्पिटल उद्या लातुरात, २० दिवस स्टेशनवर मुक्काम
* पेट्रोल झाले स्वस्त, आज लातुरात ८४ रुपये ९९ पैसे
* बीदर-कोल्हापूर रेल्वेचे उदगीर आणि लातुरात स्वागत, खासदारांनी केला लातुरपर्यंत प्रवास
* लातूर मनपाच्या सर्वसाधारण सभेत १५ कोटींच्या कामांवरुन गदारोळ
* रेल्वे रुग्णालयात सर्वांना मिळणार सर्व प्रकारचे मोफत उपचार
* प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस, वेतवाढीवर अद्याप निर्णय नाही
* काश्मिरात अतिरेक्यांच्या गोळीबारात संपादक शुजात बुखारी यांचा मृत्यू
* गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेत उपचार घेऊन आले परत
* अतिरेकी अबू जिंदाल यानं माहितीच्या अधिकारात मागवली बीडच्या निवडणुकीची माहिती, प्रशासनाने नाकारली
* एकनाथ खडसे कधीच भाजपा सोडणार नाहीत- सुधीर मुनगंटीवार
* बाळासाहेबांच्या अटकेच्या फाईलवर सही करताना छगन भुजबळ यांनी आपला सदसदविवेक का वापरला नाही?- सुधीर मुनगंटीवार
* राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काही पंपावर देण्यात आले चार रुपयांनी पेट्रोल स्वस्त
* अधिक मासानिमित्त विठठलाच्या चरणी जमा झाले अडीच कोटी
* डिझेल दर वाढीमुळे मालवाहतुकदारांचा १८ जूनपासून देशव्यापी संप
* जळगावातील पारनेर गावात विहीरीत पोहणार्‍या तीन बालकांना मारहाण गावात नग्न धिंड
* तिसर्‍या महाआघाडीसाठी सर्व पक्षांशी बोलणी सुरु- अशोकराव चव्हाण
* आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना अर्धीच फी आकारली जाणार
* एसटीच्या प्रवासी दरात आजपासून लागू होणार १८ टक्के दरवाढ
* मुंबईतील लोकल रेल्वेमार्ग उडवून देण्याचा अतिरेक्यांचा इशारा
* यापुढे प्रत्येक २१ जूनला शाळेत करावी लागतील योगासने
* मुंबईच्या पाणीपट्टी वाढ, ३.७२ टक्क्यांनी पाणी महागले
* ९८ व्या मराठी संमेलनाचा आज समारोप
* सलमानचा बहुचर्चित ‘रेस ३’ आज होणार प्रदर्शित
* राज्यात पावसाने दिली ओढ, मान्सूनचे ढग हटले, आताच पेरणी न करण्याचा सल्ला
* केरळातील पुरातून २१ जणांना वाचवले


Comments

Top