HOME   महत्वाच्या घडामोडी

लातूर मनपा आयुक्त अन महापौर बचावले, आज इदनिमित्त बीएसएनलची ७८६ ची ऑफर! भय्युजींच्या संपत्तीचं वाटप, गौरी लंकेशच्या हत्येची कबुली.......१६ जून २०१८

लातूर मनपा आयुक्त अन महापौर बचावले, आज इदनिमित्त बीएसएनलची ७८६ ची ऑफर! भय्युजींच्या संपत्तीचं वाटप, गौरी लंकेशच्या हत्येची कबुली.......१६ जून २०१८

* देशभरात आज रमजान ईद
* लातुरात इदगाह मैदानावर सामिहिक प्रार्थना, रस्ते वाहतूक वळवली
* ईद स्पेशल: बीएसएनएल देणार ३०० जीबी डेटा, STV७८६ च्या प्लॅनमध्ये
* लातूर मनपाची सभा अवैध, सक्षम कारणे देऊनही प्रकाश पाठकांचे कुणीही मनावर घेईना
* उदगीरच्या कृषी कार्यालयात शेतकर्‍याचा अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न
* अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या रविवारी लातूर दौर्‍यावर, अनेक कार्यक्रम
* अर्थमंत्री मुनगंटीवार सकाळी दहा वाजता लातुरात, तीन वाजता परत फिरणार
* काल मनपात दीपक सूळ यांनी फेकलेल्या माईकचे तुकडे आयुक्त आणि महापौराच्या कानाजवळून गेले, दोघेही बचावले!
* भय्युजी महाराजांच्या संपत्तीची वाटणी, मुलगी कुहूला ७० तर पत्नी आयुषीला ३० टक्के
* सीआयए म्हणते, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या अतिरेकी संघटना!
* दोन तीन दिवसात मान्सून पुन्हा सक्रीय होणार
* नाशिक-दिल्ली विमान सेवा सुरु, दोन तासात २८०० रुपयात आठवड्यातून तीन दिवस करता येणार प्रवास
* कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सर्व जातींचे पुजारी नेमणार
* पगारी पुजारी नेमण्याचा प्रयत्न झाल्यास मुलाखती उधळून लावणार- कृती समितीचा इशारा
* उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या यांच्या उपस्थितीत पार पडला नाट्य संमेलनाचा समारोप
* भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी नाट्य परिषदेला दिली ५ लाख रुपयांची देणगी
* अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे माजी आमदार दगडू पाटील बडे यांचे निधन
* जेष्ठ पत्रकार, 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारी हत्येप्रकरणी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात
* परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या, कॉम्रेड गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी तिघांची एकाच हत्याराने- एसआयटी
* धर्मासाठीच आपण गौरी लंकेश यांची हत्या केली, परशुराम वाघमारे याची कबुली
* निर्लेप कंपनी घेतली बजाजने
* जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवली, अभियांत्रिकी, फार्मसी, फाइन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना दिलासा
* व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीसाठी राज्यभरातून साडेचार लाख कार्यकर्त्यांची संघटना उभारणार- अण्णा हजारे यांचे प्रतिपादन
* जामनेरमधील दलित मुलांना मारहाण प्रकरण; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला घटनेचा निषेध
* सामान्य माणसांकडून काम करण्याची प्रेरणा मिळते: पंतप्रधान मोदी


Comments

Top