HOME   टॉप स्टोरी

प्लास्टीक बंदीविरुद्धचे आव्हान फेटाळले, शनिवारी लागू

स्वत:हून जमा करा अन्यथा आम्ही कारवाई करु, आयुक्त दिवेगावकरांचे आवाहन

प्लास्टीक बंदीविरुद्धचे आव्हान फेटाळले, शनिवारी लागू

लातूर-मुंबई: संपूर्ण प्लास्टीक बंदीला देण्यात आलेले आव्हान न्यायालयाने फेटाळले. मात्र संबंधित व्यापार्‍यांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. प्लास्टीक बंदी घोषित केली असली तरी अत्यावश्यक ठिकाणी ते वापरायला अनुमती देण्यात आली आहे. दरम्यान लातूर महापालिकेने ज्यांच्याकडे प्लास्टीक पिशव्या आहेत त्यांनी त्या त्या झोन कार्यालयात जमा कराव्यात अन्यथा ठरल्याप्रमाणे कारवाई करावी लागेल असा इशारा दिला आहे.
आज मंत्रालयात प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण संवर्धन मंडळ, मंत्री रामदास कदम आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय काटेकोरपणे बजावण्याचे ठरले. दरम्यान थर्माकोल व्यापारी असोशिएशनने रामदास कदम यांची भेट घेतली, गणेशोत्सवात थर्माकोल वापरु देण्याची परवानगी मागितली. हा विषय उच्चाधिकारप्राप्त बैठकीत ठेवण्याचे कदम यांनी सांगितले. दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सर्वसामान्यांसाठीचा हा दंड २०० रुपयापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला.
या पूर्वी लातूर महापालिकेने वेळोवेळी प्लास्टीक पिशव्यांच्य विरोधात अनेकदा मोहिमा राबवल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर प्लास्टीक जमा केले होते.विविध शाळांनीही जनजागृती फेर्‍या काढून प्लास्टीकविरोधी प्रचार केला होता. विद्यार्थ्यांनी प्लास्टीक पिशव्या जमवून मनपा प्रशासनाकडे सुपूर्त केल्या होत्या. दरम्यान थर्माकोल व्यापारी असोशिएशनने रामदास कदम यांची भेट घेतली, गणेशोत्सवात थर्माकोल वापरु देण्याची परवानगी मागितली. हा विषय उच्चाधिकारप्राप्त बैठकीत ठेवण्याचे कदम यांनी सांगितले.


Comments

Top