HOME   टॉप स्टोरी

पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढेन- अभिमन्यू पवार

मी वाडवडिलांपासून स्वयंसेवक, मुख्यमंत्र्यांचं काम हलकं करीत आहे

पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढेन- अभिमन्यू पवार

लातूर: वाडवडिलांपासून आम्ही स्वयंसेवक आहोत. मी जन्मजात कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक नंतर आहे. पक्ष देईल त्या सूचना, जबाबदार्‍या पाळणं माझं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार सांगतात. त्यांनी आज विश्रामगृहात जनता दरबार घेतला. या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी बोललो. आपण मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक झाल्यापासून विधानसभा लढणार अशी चर्चा आहे याबबत काय असे विचारले असता, पक्ष देईल तो आदेश मला पाळावाच लागेल, पक्षाचा आदेश कधीच डावलला नाही डावलणार नाही असे उत्तर त्यांनी हसतमुखाने दिले.
आज या दरबारासाठी विश्रामगृह तुडूंब भरले होते. जिल्हाभरातील नागरिकांनी गर्दी केली होती. शिक्षण, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आदी अनेक क्षेत्रांशी संबंधित तक्रारी आणि मागण्या लोक घेऊन आले होते. दुपारी बारा ते दोन अशी वेळ यासाठी देण्यात आली होती. पण चार वाजताही गर्दी कायमच होती. लोकांना कामे घेऊन मुंबईला येणे परवडत नाही. त्यासाठीच लातुरला आपण आलो. आपण मुख्यमंत्र्यांचं काम हलकं करीत आहोत असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं.


Comments

Top