HOME   व्हिडिओ न्यूज

हजारो विद्यार्थ्यांनी घेतले चव्हाण सरांचे दर्शन

स्टेप बाय स्टेपच्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांची गर्दी

हजारो विद्यार्थ्यांनी घेतले चव्हाण सरांचे दर्शन

लातूर: स्टेप बाय स्टेप शिकवणीचे संस्थापक संचालक अविनाश चव्हाण यांनी अल्पावधीत मोठे नाव आणि आणि यश कमावले होते. याच स्पर्धेतून त्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. काल शवविच्छेदन झाल्यानंतर नातलगांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला होता. समाजाचे नेते विजय चौगुले आल्यानंतर त्यावर तोडगा निघाला. चौगुले यांनी सर्वांची समज काढली. शिष्टमंडळासह जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची भेट घेतली. आरोपींना तातडीने ताब्यात घेऊ, कारवाई करु असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढे तो स्टेप बाय स्टेपच्या हॉलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. हजारो विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी चव्हाण सरांचे दर्शन घेतले.


Comments

Top