HOME   व्हिडिओ न्यूज

राज्यकर्त्यांनी गुन्हेगारांना जवळ फिरकू देऊ नये- आ. अमित देशमुख

क्लास मालकांकडे शस्त्र परवाने, इंटेलिजन्स फेल्युअर, सर्रास हप्तेखोरी, पॅटर्नच्या प्रतिमेला जबर धक्का

राज्यकर्त्यांनी गुन्हेगारांना जवळ फिरकू देऊ नये- आ. अमित देशमुख

लातूर: गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या व्यक्तींना राजकारण्यांनी जवळही फिरकू देऊ नये असा सल्ला आ. अमित देशमुख यांनी दिला आहे. अविनाश चव्हाण यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
पोलिसांनी याआधीच पावले उचलली असती, दक्षता बाळगली असती तर ही टळले असते, कायद्याने गुन्हेगारांना झालीच पाहिजे, राज्य सरकारच्या गृहखात्याचे हे अपयश आहे. इंटिलिजन्स फ़ेल्युअर आहे, शिकवणी क्षेत्रातील गुन्हेगारी विश्वाची अशी कुजबुज होतीच, जे काही प्रकार अलिकडे ऐरणीवर आले होते त्यामुळे असं काही घडेल अशी भिती सामान्य माणसांच्या मनात होती. पोलिस खात्याचे काम नीटपणे होत नाही असे जेव्हा काही व्यावसायिकांना जाणवले तेव्हाच प्रोटेक्शन वगैरे प्रकार पुढे आले, क्लासच्या मालकांना शस्त्राचे परवाने देण्यात आले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी, भवितव्यासाठी पावले उचलली पाहिजेत, जोवर हे प्रश्न मिटत नाहीत तोपर्यंत ते लावून धरणे ही कॉंग्रेस पक्षाची भूमिका राहील.
या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हप्तेखोरी सर्रास सुरु आहे ती शोधून काढली पाहिजे, स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे घडत असेल तर त्याला प्रतिबंध घातला पाहिजे. सर्वच राज्यकर्त्यांनी आपल्या भोवती गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोकं असणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. या घटनेमुळे लातूर पॅटर्नच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसला आहे. यातून सावरणे सोपे काम नाही. यातून सावरण्यासाठी जे काही शक्य आहे ते आम्ही करु. जिथे चुकीचं चाललं आहे ते होणार नाही याची काळजी घेणं सरकारचं काम आहे. कोचिंग क्लासचा व्यवसाय कायद्याला धरुन असला पाहिजे. यात होणारा हस्तक्षेप मोडून काढला पाहिजे, लातुरची शैक्षणिक प्रतिमा डागाळली आहे ती अधिक डागाळू नये आसाठी आमचा प्रयत्न असेल असेही आ. अमित देशमुख यांनी सांगितले.


Comments

Top