HOME   लातूर न्यूज

चव्हाण खून प्रकरणात दुसरे पिस्तुल जप्त

पहिले खराब निघाले म्हणून दुसरे बदलून घेतले

चव्हाण खून प्रकरणात दुसरे पिस्तुल जप्त

लातूर: अविनाश चव्हाण खून प्रकरणात आणखी एक पिस्तुल रमेश मुंडे याच्या घरातून पोलिसांनी जप्त केले आहे. केजच्या मुंडेकडून पहिल्यांदा घेतलेले पिस्तुल ठीक नसल्याने ते परत करण्यात आले. त्या बदल्यात दुसरे पिस्तुल घेण्यात आले. तेच खुनासाठी वापरण्यात आले. पिस्तुल विकणारा आरोपी रमेश मुंडे सध्या पोलिस कोठडीत आहे. दरम्यान सुरूवातीला अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची कोठडी काल संपल्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाचही आरोपींची कोठडी ०७ जुलैपर्यंत वाढविली. अविनाश चव्हाण खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच अरोपींकडून रोज नवनवे खुलासे होत असल्यामुळेच या गुन्ह्यात केज येथील रमेश मुंडे या आरोपींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. चौकशी दरम्यान शार्पशूटर करण गहिरवाल या आरोपीने गुन्हात वापरलेली पिस्तूल ही केज येथील रमेश मुंडे याच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. परंतु हे पिस्तूल देण्यापुर्वी या आरोपीने करणला आणखी एक पिस्तूल दिलेले होते. परंतु ते पिस्तूल व्यवस्थित नसल्यामुळे करणने मुंडेला परत केले आणि दुसर्‍या पिस्तुलची मागणी केली. त्यामुळे मुंडेने आधीचे पिस्तूल ठेवून घेउन दुसरे पिस्तूल दिले. पोलिसांनी गुन्ह्यात वापारलेली पिस्तूल आणि १३ गोळ्या जप्त केल्या, परंतु आधीचे पिस्तूल मुंडे यांच्या केजमधील घरात असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलीस उपाधीक्षक हिम्मत जाधव यांच्या पथकाने केज येथील त्याच्या घरातून ही पिस्तूल जप्त केले.


Comments

Top