HOME   लातूर न्यूज

शासकीय रुग्णालयातील अन्नसेवेचा ५ वा वर्धापन दिन

अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून रोटरीचा क्लबचा उपक्रम स्तुत्य

शासकीय रुग्णालयातील अन्नसेवेचा ५ वा वर्धापन दिन

लातूर: शासकीय रुग्णालयातील रोटरी मोफत अन्नसेवेचा ५ वा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत गोरे यांनी रोटरी क्लबचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.
रोटरी मोफत अन्नसेवेच्या वर्धापन दिन समारंभात डॉ. श्रीकांत गोरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी शासकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. अजित नागावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित वाघमारे, रोटरी वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम.एस. कुलकर्णी, सचिव हावगीराव पांढरे, रोटरीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कालिया, प्रकल्प चेअरमन राज धूत, माजी प्रांतपाल डॉ. हरिप्रसाद सोमाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय रुग्णालयात येणारा रुग्ण हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. त्यात ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. या रुग्णांच्या नातेवाईकांना रोटरीतर्पेâ मोफत अन्नसेवेचा लाभ होत आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असते म्हणून रोटरीचा क्लबचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे मत डॉ. श्रीकांत गोरे यांनी व्यक्त केले. प्रकल्प चेअरमन राज धूत यांनी गेली पाच वर्षे रोटरी क्लबचा मोफत अन्नसेवेचा उपक्रम सुरु आहे. १८२५ दिवसांमध्ये १ लाख ३७५ रुग्णांच्या नातेवाईकांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे सांगितले. सर्वांच्या योगदानातून हा अन्नसेवेचा यज्ञ सुरु असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी अन्नदाते विश्वनाथ बिरादार, अ‍ॅड. विजय बिराजदार, शामसुंदर खटोड, विश्वनाथ इंगळे यांचा वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नानिक जोधवानी, मोहन परदेशी, विश्वनाथ इंगळे, बसवराज उटगे, मन्मथप्पा येरटे, किरण किटेकर, प्रसाद राठी, नरेंद्र कोरे, बाबूराव सोमवंशी, अ‍ॅड. शशांक जोशी, बंकटलाल सोनी, डॉ. राम बोरगावकर, प्रा. एन.एस. रेड्डी, रोटरीचे पदाधिकारी, सदस्य, रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top