logo
news image मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, बॅकलॉगही भरणार- मुख्यमंत्री news image त्रिपुरा महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारणार्‍या अकरावीची विद्यार्थिनीचा मत्यू news image दूध आंदोलनाबाबतची बोलणी फिस्कटली, आज स्वाभिमानीचे रास्ता रोको news image दूध आंदोलनात मनसेचीही उडी, गुजरातहून येणार्‍या गाड्या अडवल्या news image मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करणार- मराठा आंदोलकांचा इशारा news image उजनीच्या पाणी पातळीत वाढ news image नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो news image धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन महत्वाच्या धरणात शून्य टक्के पाणी news image पंतप्रधानांवर अविश्वास ठराव, उद्या येणार चर्चेला news image जळगावच्या केळी शीतगृहात स्फोट news image प्रियंका चोप्रा येणार वेब सिरिजमध्ये news image महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून एक लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी

HOME   लातूर न्यूज

युवक कॉंग्रेस नोंदणीला मोठा प्रतिसाद

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी सुरु

युवक कॉंग्रेस नोंदणीला मोठा प्रतिसाद

लातूर: अखिल भारतीय युवक कॉंग्रेस सदस्य नोंदणीला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असून असाच प्रतिसाद लातूर जिल्ह्यातही मिळत आहे. जास्तीत जास्त युवकांनी या सदस्य नोंदणीत सहभाग नोंदवावा असे आवाहन युवक कॉंग्रेसचे निवडणूक अधिकारी हाकूरसिंह बिस्ट यांनी केले आहे. ते लातूर येथील कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राजात युवक कॉंग्रेस नोंदणीला दोन वेळा मुदतवाढ दिली असून या सदस्य नोंदणीसाठी ऑफलाईनमध्ये ०९ जुलै २०१८ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत फॉर्म भरता येतील. १० व ११ जुलै रोजी ऑनलाईन नोंदणी करता येईल. या नोंदणीत जास्तीत जास्त युवक कसे सहभागी होतील यावर लक्ष द्यावे असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत लातूर शहर विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश काळे, नगरसेवक पुनित पाटील, लातूर ग्रामीण युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, इम्रान सय्यद, सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष हरीराम कुलकर्णी, ओबीसी सेलचे अध्यक्ष नेताजी बादाडे, इसरार सगरे, नयुम सय्यद, पिराजी साठी, सूरज विभुते उपस्थित होते.


Comments

Top