HOME   महत्वाच्या घडामोडी

अपडेटेड...त्रिपुराच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, कोरम अभावी लातूर मनपा स्थायीची सभा रद्द, लातुरच्या क्रीडा संकुलावर तरुणाचा मृत्यू, मनुस्मृतीचा खप वाढला, किचनमध्ये विषारी साठ साप......१७०७१८

अपडेटेड...त्रिपुराच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, कोरम अभावी लातूर मनपा स्थायीची सभा रद्द, लातुरच्या क्रीडा संकुलावर तरुणाचा मृत्यू, मनुस्मृतीचा खप वाढला, किचनमध्ये विषारी साठ साप......१७०७१८

* लातुरच्या त्रिपुरा महाविद्यालयातील ११ वीच्या विद्यार्थीनीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
* त्रिपुराची विद्यार्थिनी गंभीर जखमी, सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु
* कोरम अभावी लातूर मनपाच्या स्थायी समितीची बैठक रद्द
* लातूर मनपाची स्थायी समितीची बैठक कोरमअभावी तहकूब, भाजपचे चार सदस्य आलेच नाहीत पण कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांचा बहिष्कार
* पुण्यात उद्यापासून चितळेंचं दूध मिळणार नाही
* पुण्यात महादेव जानकारांच्या नावाची पाटी गाढवाच्या गळ्यात घालून मिरवणूक, गाढवाला दुग्धाभिषेकही घातला
* करण भताने या २० वर्षांच्या तरुणाचा लातुरच्या क्रीडा संकुलावर धावण्याचा सराव करताना हृदयविकाराने जागीच मृत्यू
* करण चाकूर तालुक्यातला, त्याला पोलिस व्हायचं होतं
* लातूरचे व्यापारी २१ बसेसद्वारे ११०० वारकरी पंढरपूरला मोफत पाठवणार
* लातूरच्या मनसेने पीक विमा मंजूर करावा यासाठी इन्सुरन्स कंपनीसमोर केली निदर्शने
* राज्यभरात स्वाभिमानीचे दूध बंद आंदोलन
* भिडे यांनी केलेल्या मनुच्या समर्थनानंतर 'मनुस्मृति'ची पुस्तकाची विक्री वाढली
* छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या उंचीवरुन विधानसभेत मोठा गदारोळ
* गुजरातहून येणार्‍या दुधाच्या गाड्या आंदोलकांनी अडवल्या
* राज्यातील दुधाचे बंद पाडण्यासाठी अमूलचे दूध, हे दूध घेऊ नका, राजू शेट्टी यांचे आवाहन
* दूध आंदालनामागे कोणताही राजकीय हेतू नाही: राजू शेट्टी
* 'वन नेशन, वन इलेक्शन'ला रजनीकांत यांचा पाठिंबा
* मालेगावच्या गाळणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ शेळ्या ठार
* आंबेडकर विद्यापिठानं सहा नापास विद्यार्थ्यांना दिल्या डिग्र्या, संबंधितांना बजवल्या नोटिसा
* मुलं चोरीची अफवा; गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून हत्या
* कल्याणच्या प्रवासात महिलेनं दिला रेल्वेत जन्म
* देशातील नागरिक कायदा हातात घेऊ शकत नाहीत; गोरक्षकांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
* शिर्डीत गावठी पुस्तुले विकतांना दोघांना अटक, दोन पिस्तुले आणि काडतुसे जप्त
* चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात सापडला पट्टेदार वाघाचा मृतदेह
* शेतमालाच्या आधारभूत किंमतीत केंद्र सरकारने वाढ, गहू, ज्वारी, बाजरीसह डाळींच्या दरात वाढ
* मध्य रेल्वेने घेतला परळच्या पुलाचा आढावा, पूल सुरक्षित
* मुंबई आबादी आबाद, पाणी पुरवठा करणारा मोडक सागर तलाव भरुन वाहू लागला
* परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बहरीनच्या दौऱ्यावर, पंतप्रधान खलिफा बिन सलमान अल खलिफा यांची घेतली भेट
* हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेतील किचनमध्ये ६० विषारी साप
* मुंबईच्या समुद्रात आजही उसळणार * लाटा


Comments

Top