logo
news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार news image राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत पाटील यांचा आज वाढदिवस news image सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार news image हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस news image शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल news image माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्‍वास news image माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन news image मराथा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्‍वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न news image आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला

HOME   लातूर न्यूज

त्रिपुरा कॉलेजातून उडी घेणार्‍या त्या विद्यर्थिनीची तब्येत अजून गंभीरच

उडी घेण्यापूर्वी अनेकांनी तिला टॉर्चर केलं, त्याचा व्हिडीओ पत्रकार परिषदेत प्रसारित करण्याचा दावा

त्रिपुरा कॉलेजातून उडी घेणार्‍या त्या विद्यर्थिनीची तब्येत अजून गंभीरच

लातूर: लातुरच्या अंबाजोगाई मार्गावरील त्रिपुरा रिलायन्स विज्ञान महाविद्यालयात अकरावीत शिकणार्‍या हातकणंगले तालुक्यातील वडगाव या गावच्या एका मुलीनं कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरुन खाली उडी मारली. यात ती प्रचंड जखमी झाली. डोक्याला भयंकर मार तर लागलेलाच आहे शिवाय अनेक हाडे फ्रॅक्चर झाली आहेत. राजीव गांधी चौकातील सह्याद्री रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. दोन तीन ऑपरेशन्स यशस्वी झाली पण ती अजून कोमातच आहे. कसलीही हालचाल करीत नाही. तिला असंच व्हेंटीलेटरवर ठेवा. ती उठेल
असं तिच्या नातलगांना वाटते. पण डॉक्टर्स हमी द्यायला तयार नाहीत. दरम्यान काल घडलेल्या या घटनेबाबत शिवाजीनगर पोलिस ठाणे आज गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करीत आहे.
काही मुस्लीम संघटनांनी या घटनेवर लक्ष केंद्रीत केले आहे. उडी मारण्यापूर्वी या मुलीला प्रचंड टॉर्चर करण्यात आले. सुमारे तासभर एक शिक्षक आणि एक शिक्षिका शिवाय अनेक विद्यार्थी त्यात सहभागी होते. तिने टॉर्चर सहन करीत शेवटच्या क्षणी खाली उडी मारली. त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे असं या संघटनांचं म्हणणं आहे. पत्रकार परिषद घेऊन हे सत्य पत्रकारांसमोर मांडणार आहोत असं या संघटनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे.


Comments

Top