HOME   टॉप स्टोरी

आ. अमित, धीरज देशमुखांनी केला चक्का जाम

वासनगाव फाट्यावर लटकली हजारो वाहने, मराठा समाजाच्या मागण्यांचा एल्गार

आ. अमित, धीरज देशमुखांनी केला चक्का जाम

लातूर: मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. तद्वतच लातूरही बंद राहिले. लातुरात सगळ्याच चौकात टायरं जाळण्यात आली, लाकडाची मोठमोठी ओंडकी जाळण्यात आली. वासनगाव फाट्यावर झालेल्या चक्का जाममध्ये आ. अमित देशमुख, धीरज देशमुख, वैजनाथ शिंदे, व्यंकट बेद्रे, आदी अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य आहेत. तो त्यांचा हक्क आहे. सरकार मुद्दाम हे प्रकरण न्यायालयात टिकू नये अशी व्यवस्था करीत आहे. असं आ. अमित देशमुख म्हणाले.


Comments

Top