HOME   लातूर न्यूज

आदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख

राजकारणात राहून देखील त्यांनी तत्वाशी कधी तडजोड केली नाही

आदर्श व्यक्तीमत्वास देश मुकला- धीरज देशमुख

लातूर,(प्रतिनिधी): माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तीमत्व खूप प्रभावी होते. ते जरी एका पक्षाचे प्रमुख नेते असले तरी अन्य पक्षात त्यांना माणणारा मोठा वर्ग होता. त्यांचे व्यक्तीमत्व जेवढे प्रभावी होते तेवढेच दिलदार देखील होते. जाहीरपणे तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची प्रशंसा करुन त्यांनी आपल्यातील दिलदारपणा दाखवून दिला होता. त्यांचे आपल्यातून जाण्याने देशाची खूप मोठी हानी झाली आहे अशा शब्दात स्व. अटल बिहारी वाजपायी यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
कवी मनाचे अटलजी सर्वांनाच प्रिय होते. त्यांनी लिहिलेल्या कविता आजदेखील तरूण वर्गात मोठ्या आवडीने वाचल्या व ऐकल्या जातात.
राजकारणात राहून देखील त्यांनी तत्वाशी कधी तडजोड केली नाही. पक्षातील कोणताही व्यक्ती चुकीचे वागत असेल तर जाहीरपणे त्याला समज देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली होती. राजकारणात वावरणार्‍या तमाम युवकांना अटलजींच्या व्यक्तीमत्वातून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांचे आपल्यातून जाण्याने प्रभावी व आदर्श व्यक्तीमत्वास सारा देश मुकला आहे. त्यांची पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा भावना धीरज विलासराव देशमुख यांनी शोकसंदेशात व्यक्त केल्या आहेत.


Comments

Top