HOME   टॉप स्टोरी

शौचालय होणार अग्नीशमनच्या जागेत

लातूर मनपा परिसरात फायर ब्रिगेड

शौचालय होणार अग्नीशमनच्या जागेत

लातूर: लातुरात सार्वजनिक शौचालयाचे वांदे आहेत. दोन चार ठिकाणे सोडली तर अवघडलेपण कुठं दूर करावं याचा प्रश्न शहरातील आणि बाहेरील नागरिकांना पडतो. मनपा जागा शोधते आहे. गोलाई आणि अण्णाभाऊ साठे चौकातील प्रयत्न हाणून पाडल्यानंतर नवीन जागांचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार अशोक हॉटेल चौकातील यशवंतराव चव्हाण संकुलात असलेल्या अग्नीशामक दलाच्या जाग्त सुलभ शौचालय बांधले जाणार आहे. अग्नीशामक दलाला ही जागा ताबडतोब सोडण्यास सांगण्यात आले असून त्या बदल्यात मनपाच्या भंगार पडलेल्या जागेत अग्नीशामक दलाला जागा देण्यात येणार आहे.


Comments

Top