HOME   महत्वाच्या घडामोडी

मोदींच्या पोस्टरबाजीवर ६० कोटींचा खर्च, परभणीत पेट्रोल ९० रुपये, इथेनॉल वापरल्यास पेट्रोल ५५ रुपये, सातारऽयात डॉल्बी वाजणारच- खा. उदयनराजे ११ सप्टेंबर २०१८

परभणीत पेट्रोल ९०.१४ रुपये लिटर

मोदींच्या पोस्टरबाजीवर ६० कोटींचा खर्च, परभणीत पेट्रोल ९० रुपये, इथेनॉल वापरल्यास पेट्रोल ५५ रुपये, सातारऽयात डॉल्बी वाजणारच- खा. उदयनराजे ११ सप्टेंबर २०१८

* आज पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी वाढले, दहा दिवसात २ रुपये ११ पैशांची वाढ
* परभणीत पेट्रोल ९०.१४ रुपये लिटर
* जाळून घेण्यासाठीही पेट्रोल घेणे परवडेना, एक प्रतिक्रिया
* इथेनॉलचा वापर झाल्यास पेट्रोल ५५ रुपये तर डिझेल ५० रुपयांनी मिळेल- नितीन गडकरी
* भारत चार मोठे इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणार- नितीन गडकरी
* शिवसेनेची आवस्था केसाळ कुत्र्यासारखी, या पक्षाला स्वत:ची भूमिकाच नाही- राज ठाकरे
* पैसे कमी पडले की सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा शिवसेना करते- राज ठाकरे
* अमिताभ बच्चन यांनी कर्जग्रस्त शेतकर्‍यांचे कर्ज फेडण्यासाठी राज्य सरकारला दिले दोन कोटी, मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांनाही मिळणार लाभ
* सातार्‍यात डॉल्बी वाजणारच, काय करायचं ते करुन घ्या- खा. उदयनराजे भोसले
* जात प्रमाणपत्र सादर न करणार्‍या पुण्याच्या सात नगरसेवकांची पदे धोक्यात, भाजपच्या पाच जणांचा समावेश
* शाळा, परिवार वा सार्वजनिक ठिकाणी मुले सुरक्षित राहावीत याकरिता ‘रक्षा अभियान’ राबविण्याच सरकारचा निर्णय
* राज्यात शाळेत असेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता शाळांवर, आजपासून तीन वेळा हजेरी घेणे सक्तीचे
* अनधिकृत व्यक्ती शाळेत प्रवेश करणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना
* शाळेच्या बसमधून प्रवास करणारी शेवटची मुलगी घरी पोहोचेपर्यंत बसमध्ये महिला सेविका किंवा शिक्षिका असणे बंधनकारक
* मुला - मुलींची स्वच्छतागृहे एकमेकांपासून पुरेशा अंतरावर असणे बंधनकारक
* राज्य बालहक्क आयोगाने तयार केलेल्या चिराग मोबाईल अ‍ॅपची माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना
* सकल मराठा समाज राजकीय पक्षाची करणार ऑक्टोबरमध्ये अधिकृत घोषणा
* मराठा आरक्षणासाठी नगर जिल्ह्यात विद्यार्थीनीची आत्महत्या
* सोसायट्या, व्यावसायिक संस्था, मॉल व बाजारपेठांमधील कचरा उचलण्यासाठी शुल्क आकारण्याचा मुंबई महापालिकेचा विचार
* दादरमध्ये थर्माकोलच्या मखरांची खुलेआम विक्री
* कोकण किनारपट्टीवर माशांच्या साठवणुकीसाठी निळा म्‍हणजे अखाद्य बर्फ वापरला तर कठोर कारवाई
* पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात ११ गावांतील सांडपाणी
* बीटपासून साखर उत्पादन करण्याची वेळ आली आहे- शरद पवार
* खुनाच्या खोटय़ा गुन्ह्यात अडकवणार्‍या पोलिस दलाला पाच लाख नुकसान भरपाई देण्याची नागपूर खंडपीठाची शिक्षा
* डिफेन्स इनोव्हेशन हब होणार नाशिकला - संरक्षण राज्यमंत्री
* स्वाइन फ्लूमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये तीन दिवसात ०६ जणांचा मृत्यू
* मोदींच्या पोस्टरबाजीसाठी सामान्यांच्या खिशातला पैसा जातो, पोस्टरबाजीवर ६० कोटींचा खर्च- रणदीप सुरजेवाला
* दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
* तेल कंपन्यांच्या उपलब्धतेवर इंधनाचे दर अवलंबून, इंधन दर कमी करणे सरकारच्या हातात नाही- केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद
* नरेंद्र मोदींनी जनतेचा विश्वासघात केला, केवळ मोठी आश्वासनं दिली- राहुल गांधी
* समलैंगिक विवाहांमुळे नैसर्गिक संकट येऊ शकते- पुलियाकुलममधील चर्चचे धर्मगुरू
* दरवर्षी देशात किमान दोन लाख जण वेळीच प्रथमोपचार न मिळाल्याने दगावतात


Comments

Top