HOME   महत्वाच्या घडामोडी

दनवेंचे संतुलन विघडले, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिघडली, महागाईचा फरक पडत नाही- आठवले, शाळांनी माजे विद्यार्थ्यांना मदत मागावी, फडणवीस-भागवत भेट......१६ सप्टेंबर २०१८

वाढत्या महागाईचा फरक पडत नाही, मंत्री असल्यानं बरंच काही मोफत मिळतं- रामदास आठवले

दनवेंचे संतुलन विघडले, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिघडली, महागाईचा फरक पडत नाही- आठवले, शाळांनी माजे विद्यार्थ्यांना मदत मागावी, फडणवीस-भागवत भेट......१६ सप्टेंबर २०१८

* देशाची आर्थिक स्थिती आणि विकास दर वाढेल- अरुण जेटली
* मानवी आपत्तीग्रस्तांना सरकार मदत करणार
* महाराष्ट्राची आर्थिक स्थिती वाईट १५ व्या वित्त अयोगाचा अहवाल
* पर्रीकरांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यासाठी पंतप्रधानांनी केली खास विमान व्यवस्था
* फारुख अब्दुल्लांनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
* मिस पुणे फेस्टीवलमध्ये सौंदर्यवर्तींचा मोठा प्रतिसाद
* मुंबईत महिलांच्या लोकलच्या डब्यात हस्तमैथुन करुन लघुशंका करणार्‍या तरुणाला अटक
* वाढत्या महागाईचा फरक पडत नाही, मंत्री असल्यानं बरंच काही मोफत मिळतं- रामदास आठवले
* देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक भेट, मंत्रिमंडळ विस्तार आणि मराठा आरक्षणावर झाली चर्चा
* वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये, पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस
* मुंबईत सारस्वत बँकेच्या शताब्दी सोहळ्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर
* सहकारी संस्था सामान्य माणसाला मदत करतात, केंद्र सरकारने या संस्थांना मदत करावी- शरद पवार
* क्रिकेट व अन्य खेळांसह सैन्यभरतीत आरक्षण हवे, २०१९ मधील निवडणुकीत भाजपाला ३०० पेक्षा अधिक जागा मिळणार- रामदास आठवले
* नागपुरात मतदारांच्या वाहनांची माहिती गोळा करण्याच्या भाजपच्या नगरसेवकांना सूचना, नगरसेवक व कार्यकर्ते नाराज
* निवडणुका स्वबळावर लढल्यास भाजप-शिवसेनेचे नुकसानच- मुख्यमंत्री
* नितीन गडकरी यांनी नागपुरात प्रभाग पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून राजकीय स्थितीचा घेतला आढावा
* अहमदनगर येथे झेलम एक्स्प्रेसच्या धडकेत २५ मेंढ्या ठार
* सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळांनी माजी विद्यार्थ्यांकडे अर्थ सहाय्य मागावे- प्रकाश जावडेकर
* शिक्षण संस्थांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्रकाश जावडेकरांनी माफी मागावी- मनविसे
* फडणवीस सरकारने आरक्षणाचा कायदा न केल्याने मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित राहिला- भाजप आमदार आशिष देशमुख
* पुण्यात चालक नसलेली गाडी धावली ७० मीटर, १३ पादचारी जखमी, उतारावर चालू गाडी उभी करुन चालक गेला दुकानात
* दाभोलकर हत्या प्रकरण: मारेकऱ्यांच्या मदतीसाठी पुलावर आणखी ०२ जण होते- चार पिस्तुलांची लावली विल्हेवाट - सीबीआय
* दाभोलकर हत्या प्रकरण: शरद कळसकरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
* नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण: वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकरची न्यायालयीन कोठडी वाढविली १४ दिवसांनी, पुढील सुनावणी २९ सप्टेंबरला
* विरोधकांच्या आरोपांमुळे रावसाहेब दानवेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे- अशोक चव्हाण
* काँग्रसेमुळे पेट्रोल दरवाढ, राफेल विमान घोटाळयात काँग्रेसच अडकलीय, जनसंघर्ष यात्रेचा भाजपला फायदा- रावसहेब दानवे दानवे
* पुणे येथे दहा हजार पाणी पुऱ्यांनी बनवली गणपतीची मूर्ती
* नाशिकमध्ये साडे नऊ लाखांचा विदेशी मद्य साठा जप्त
* कायद्यात तरतूद नसताना मुलालाच खाजगी पीए बनवून नागपुरच्या महापौर नंदा जिचकार सॅनफ्रान्सिस्को दौर्‍यावर
* मुंबई-गोवा क्रूझ सेवा सुरु होणार ११ ऑक्टोबरला, एक दिवसाआड क्रूझने जाता येणार गोव्याला
* राफेल विमान खरेदी प्रकरणात राबवली नियमबाह्य प्रक्रिया, जनतेच्या कराचा पैसा कोणाच्या खिशात गेला?- हर्षवर्धन पाटील
* ठाण्यातील एका सोसायटीत बाप्पाच्या दर्शनाला येताना नैवेद्याऐवजी वहीपेन आणण्याचे आवाहन
* सीबीआयमध्ये नरेंद्र मोदींचा विशेष मर्जीतील अधिकार्‍याने केली विजय मल्याला देशाबाहेर पळून जाण्यास- राहुल गांधी
* मला अजून ५० वर्षं काम करायचं आहे- बाबा रामदेव
* नरेंद्र मोदींनी केला 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचे उद्घाटन, टाटा ट्रस्टचे स्वच्छता मोहिमेसाठी १०० कोटीचे योगदान- पंतप्रधान
* 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेअंतर्गत नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद, मानले रतन टाटा, अमिताभ यांचे आभार
* चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या स्वच्छता अभियानला मिळतोय प्रचंड प्रतिसाद, देशातील प्रत्येक नागरिकाचा यात सहभाग- नरेंद्र मोदी
* महिलेच्या लिंगबदल शस्त्रक्रियेवर लेख प्रसिद्ध केल्याने 'सेदाय इस्लाहत' वृत्तपत्रावर इराणमध्ये बंदी


Comments

Top