logo
news image पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक news image पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक news image राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल news image ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे news image सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे news image मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा news image पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा news image माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु news image पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी news image आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत news image राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे news image २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे news image भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे news image बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे

HOME   लातूर न्यूज

अतिक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन

अतिक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन

लातूर: जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगद सूर्यवंशी यांच्या मालकीच्या जागेतील कॉम्प्लेक्स मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाडल्याच्या निषेधार्थ १८ सप्टेंबर रोजी मनपासमोर सर्व दलित संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने उपायुक्त संभाजी वाघमारे यांची भेट घेऊन अंगद सूर्यवंशी यांच्या मालकीच्या जागेत असलेले कॉम्प्लेक्स पाडल्याचे निदर्शनास आणून दिले व सदरील जागा त्यांच्या मालकीची असल्याची कागदपत्रे उपायुक्तांना सादर केली. या शिष्टमंडळात अंगद सूर्यवंशी यांच्यासोबत नगरसेवक सचिन मस्के, दत्ता मस्के, माजी नगरसेवक सुनील बसपुरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गायकवाड, अशोक देडे, बसवंतअप्पा उबाळे, चेअरमन विकास कांबळे, आनंदभाई वैरागे, गोविंद शिंदे, विष्णू कांबळे, मिलिंद कांबळे, महादू रसाळ, जी ए गायकवाड, मोहन सुरवसे, शाम चव्हाण, शुभम रुपसुंदरे हे उपस्थित होते.


Comments

Top