HOME   महत्वाच्या घडामोडी

डॉल्बीचा आज फैसला, पंतप्रधान होणार आणखी कडक, २९ सप्टेंबर सर्जिकल डे, आंबेडकर म्हणतात आघाडीत राष्ट्रवादी नको, आज रज्यभर पावसाची शक्यता.......२१ सप्टेंबर २०१८

आम्हाला आघाडीत राष्ट्रवादी नको- प्रकाश आंबेडकर

डॉल्बीचा आज फैसला, पंतप्रधान होणार आणखी कडक, २९ सप्टेंबर सर्जिकल डे, आंबेडकर म्हणतात आघाडीत राष्ट्रवादी नको, आज रज्यभर पावसाची शक्यता.......२१ सप्टेंबर २०१८

* डीजे, डॉल्बी प्रकरणावर उच्च न्यायालयात आज अंतीम निर्णय होण्याची शक्यता
* कोल्हापुरात प्रचंड पाऊस, ढगफुटीसदृश्य स्थिती
* आज राज्यभरात पाऊस होण्याची शक्यता
* हिंगोली, वाशिम मार्गावर भीषण अपघात सहाजणांचा मृत्यू
* खा. राजीव सातव यांचा आज वाढदिवस
* भविष्यात आणखी कडक निर्णय घेणार- पंतप्रधान
* २८ सप्टेंबरला देशभरातील औषध विक्रेते करणार भारत बंद
* ऑनलाईन औषध विक्रीला विरोध
* पेट्रोलचे दर ०९ पैशांनी वाढले
* २९ सप्टेंबरला पाळणार सर्जिकल स्ट्राईक दिन पाळणार
* आम्हाला आघाडीत राष्ट्रवादी नको शरद पवार धर्मनिरपेक्ष, मात्र राष्ट्रवादी नाही, संभाजी भिडेंचे अनेक समर्थक या पक्षात- प्रकाश आंबेडकर
* बहुजन हितासाठी एमआयएमसोबत युती, काँग्रेससोबतच्या आघाडीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहणार- प्रकाश आंबेडकर
* नागपुरात गुंडाच्या पार्टीत डान्स करणारा पोलिस अधिकारी निलंबित
* गुजरतेतील चित्रपटाच्या स्टुडीओ भीषाण आग
* यवतमाळमधील एका नदीतून बोटीने प्रवास करताना सेल्फी, पाच बुडाले, तिघांचा मृत्यू
* जेजुरीच्या दानपेटीत सापडली २०० वर्षांपूर्वीची चार नाणी
* मुकेश अंबानीच्या मुलीचा साखरपुडा
* माझ्या आंदोलनाने केंद्र सरकारला काहीही फरक पडणार नाही, पण- अण्णा हजारे
* २०११ मध्ये झालेल्या जनआंदोलनामुळेच मोदी सरकारला मिळाली सत्ता, लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीची चालढकल योग्य नाही- अण्णा हजारे
* शस्त्रक्रिया साहित्याची ९० कोटी थकित रक्कम न मिळाल्यास सार्वजनिक रुग्णालयांना साहित्य पुरविणार नाही- पुरवठादार कंपन्यांचा इशारा
* विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागांत पावसाची शक्यता
* इंधनदरवाढीमुळे नागरिक त्रस्त होत असल्याची नितीन गडकरी यांची कबुली
* ड्रायव्हिंग लायसन्सचा डेटाबेस तयार होत आहे, देशात २२ लाख चालकांचा तुटवडा, चालकरहित मोटारींना परवानगी नाही- नितीन गडकरी
* बीएड अभ्यासक्रमासाठी यावर्षी जागा कमी आणि विद्यार्थी अधिक, अनेकांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी
* अंबरनाथ येथे डॉक्टर महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ, कर्ज फेडण्यासाठी २० लाखाची मागणी, सहाजणांवर गुन्हा
* सीएसटीवरील प्लॅटफॉर्मच्या लांबीमध्ये वाढ, २४ डब्यांच्या गाड्या थांबण्याची होणार सोय
* विद्रोही साहित्यामुळे विचारांना वेगळे वळण लागले, कवितांमुळे अभिनेता म्हणून घडण्यास फायदा झाला- सयाजी शिंदे
* सयाजी शिंदे, आनंद विंगकर आणि राहुल कोसंबी यांना दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान
* झोपडीधारकांना मिळणार्‍या घरांची करता येणार विक्री
* पुणे विमानळावर 'चेक-इन'च्या रांगेत न थांबता, प्रवाशांचा चेहरा आणि तिकिटाचे स्कॅन करून मिळणार प्रवेश
* ऊसाला पहिला हप्ता पूर्णपणे ०३ हजार ५०० रूपये मिळण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची १० ऑक्टोबरला परिषद
* गांधी जयंतीपासून काँग्रेसचं 'लोकसंपर्क' अभियान
* आणखी बँका विलीन करून घेण्याचा भार सोसता येणार नाही- एसबीआय
* रेल्वेतील खाद्यपदार्थ आणि चहा, कॉफीच्या दरांत वाढ
* स्वच्छ भारताबरोबरच स्वच्छ राजकारण ही काळाची गरज, तरुण पिढीत इतिहास घडविण्याची शक्ती- आनंदीबेन पटेल
* भाषातंत्रामुळे गायीही तामिळ आणि संस्कृतमध्ये बोलू शकतील- आध्यात्मिक गुरू स्वामी नित्यानंद
* ‘खेलरत्न’साठी डावलल्याने कुस्तीपटू बजरंग पुनिया जाणार कोर्टात, क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांना आज भेटणार


Comments

Top