HOME   लातूर न्यूज

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन

लातूर: केंद्र शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना ०८ मार्च रोजी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्या अनुषंगाने नारी शक्ती पुरस्कारासाठी लातूर जिल्हयातील महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थाकडून व महिला समाजसेवीकांकडून नारी शक्ती पुरस्कारासाठी दिनांक २४ सप्टेंबर २०१ पर्यंत नामांकने मागविण्यात येत आहेत, अशी महिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लातूर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02382-248728 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी www.wcd.nic.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.


Comments

Top