HOME   लातूर न्यूज

मनपा अधिकारी-कर्मचार्‍यांनी घेतली ‘स्वच्छतेची शपथ’

आयुक्तांनी घेतला स्वच्छता कामांचा आढावा

मनपा अधिकारी-कर्मचार्‍यांनी घेतली ‘स्वच्छतेची शपथ’

लातूर: लातूर मनपाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर दररोज एका प्रभागाच्या स्वच्छतेची पाहणी करणार आहेत, काम न करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार आहे. केंद्र शासनाच्‍या निर्देशानुसार स्‍वच्‍छता सर्वेक्षण २०१९ ‘ स्‍वच्‍छता ही सेवा ’ उपक्रम अंतर्गत लातूर शहर महानगर पालिकेत स्वच्छतेच्या कामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , यावेळी आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना स्वच्छ सर्वेक्षण २०१९ बाबत च्या कामाचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले , यावेळी लातूर शहर महानगर पालिका पहिल्या १० मध्ये कसे आणता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे असे सांगून आपण स्वत: दररोज एका प्रभाची पाहणी करणार आहेत. तसेच यावेळी काम न करणार्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले , बैठकीनंतर सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सतीश शिवणे , सहाय्यक आयुक्‍त, वसुधा फड, शैला डाके ,प्रभाकर डाके , नगर अभियंता दिलीप चीद्रे , पाणी पुरवठा अभियंता बामणकर , आर.जी.पिडगे, प्रमुख स्‍वच्‍छता निरीक्षक एस.एस.राऊत, उद्यान विभाग प्रमुख, एस.एन.काझी, मालमत्‍ता व्‍यवस्‍थापक तथा स्‍वच्‍छता निरीक्षक कलीम शेख, तांत्रिक चाटे, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी, समाधान सूर्यवंशी, बंडू किसवे, रुक्मानंद वडगावे, सर्व इंजिनियर सर्व स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक स्‍वच्‍छता निरीक्षक, रोड कारकून व अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होता.


Comments

Top