HOME   लातूर न्यूज

गंज गोलाई परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई

कचरा टाकणार्‍या दुकानदारांकडून केला तीन हजार रुपयांचा दंड वसूल

गंज गोलाई परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई

लातूर: गंजगोलाई परिसरातील भाजी वाले, फळवाले व इतर पथविक्रेते तसेच पानटपरीवाले व छोटे मोटे व्यापारी भरपूर प्रमाणात व्यवसाय करीत आहेत, त्या ठिकाणी वारंवार सूचना देऊनही कचरा टाकणाऱ्यांवर मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वत: पाहणी करून कचरा करणर्यावर व अतिक्रमण केल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले व जागेवर ०३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सुभाष चौक परिसरातील लातूर फ्लावर तसेच शेख सलीम इनामदार व सतीश बिराजदार याच्यावर कारवाई करून दंड वसूल केला गेला. यावेळी गोलाई परीसरातील व्यापारी वर्गास स्वच्छतेबद्दल माहिती देण्यात आली व कचरा दिसल्यास लातूर मनपाच्या वतीने कारवाई करण्यात येईल याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच प्लास्टिक वापर केल्यास ५ हजारांचा दंड जागेवर आकारण्यात येईल असे बजावण्भ्य़ात आले. यापुढे दररोज कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे व्यापारी वर्ग व पथ विक्रेते नागरिकांनी कचरा हा घंटागाडीतच टाकावा व आपल्याकडे जमा होणारा कचरा हा ओला व सुका पद्धतीने जमा करून घंटा गाडीकडे द्यावा असे आवाहन लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top