HOME   व्हिडिओ न्यूज

जिल्ह्यात सर्रासपणे चालतोय मटका

मटका बंद नाही झाल्यास जिल्हाभर करणार आंदोलने- आर्यन सेना

जिल्ह्यात सर्रासपणे चालतोय मटका

लातूर: लातूर शहरासह जिल्हात सर्रासपणे मटका सुरू आहे. शहरातील विविध भागात मटका घेणारे लोक राजरोसपणे फिरताना दिसत आहेत. विशेषतः एकनंबर चौक, पाच नंबर चौक, नांदेड नाका, सिद्धेश्वर चौक या परिसरात खुलेआम मटका घेतला जातो आहे. तसेच जिल्ह्यात सर्वत्र हा प्रकार राजरोसपणे चालू आसल्याचे अविराजे निंबाळकर म्हणाले. याला वेळीच आळा घालण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे दिले आहे. मटक्यामुळे अनेक कुटूंब रस्त्यावर आले आहेत त्यामुळे तो बंद करण्यात यावा अन्यथा अंदोलन करण्याचा ईशारा यावेळी आर्यनसेनेचे अध्यक्ष अविराजे निंबाळकर यांनी दिला आहे. यावेळी अविराजे निंबाळकर, अनिल बेरेकर, अविनाश मगर, सुरज नागटिळक, ऋषी आगलावे, अमोल गायकवाड, बबन साबळे, विक्रांत क्षिरसागर, माधव वाघमारे उपस्थित होते.


Comments

Top