HOME   लातूर न्यूज

विलास सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर आग्निप्रदिपन

धिरज देशमुख यांनी केले सेंद्रीय ऊसाच्या गाळपाचे कौतुक

विलास सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर आग्निप्रदिपन

लातूर: मांजरा परिवारातील संस्था सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून काम करतात. यामुळे या सर्व संस्था लोकहित आणि परिसर विकासासाठी महत्वाच्या संस्था आहेत. अगोदरच दुष्काळामुळे अडचणीत असलेला शेतकरी गळीत हंगामात अडचणी येऊ नये यासाठी संचालक मंडळ आणि शेतकी विभागाने नियोजन करून सभासद व ऊसउत्पादकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर आग्निप्रदिपन कार्यक्रम प्रसंगी बोलतांना केले.
विलास सहकारी साखर कारखान्याचा सन १८-१९ च्या गळीत हंगामाचे बाँयलर अग्निप्रदिपन जिल्हा परिषद सदस्य धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते व ह.भ.प.पांडुरंग महाराज कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा दिनी करण्यात आले. यावेळी विलास कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास को. ऑपरेटिव्ह बॅक लि.चे व्हा.चेअरमन चंद्रकांत देवकते, उपसभापती दत्ता शिंदे, श्रीनिवास शेळके, राजेसाहेब सवई, ॲड.व्यंकट पिसाळ, रमेश देशमुख, राजेंद्र मस्के आदीची प्रमुख उपस्थिती होती.
योवळी पुढे बोलतांना जिल्हा परिषद सदस्य धिरज विलासराव देशमुख म्हणाले, आपण पहिल्या महिला चेअरमन म्हणून वैशालीताई देशमुख यांना सन्मान दिला आहे. मागील गळीत हंगामात त्यांनी सर्वांधिक टन ऊस कारखान्यास गळीतास दिला आहे. त्यांनी केलेले हे कार्य आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी आहे. एक महिला घरातील व्यवस्था चांगली पाहते त्यांनी तसेच शेतीत लक्ष दिल्यानंतर शेतीत सुध्दा चांगले काम होते. यामुळे महिला पुरूष असा भेदभाव न करता महिलांना शेतीमध्ये काम करण्याची जबाबदारी देणे गरजेचे आहे. कारखान्याचा गळीत हंगाम हा पाऊस न पडल्यामुळे अडचणीत आहे. यामुळे सभासद, ऊसउत्पादक शेतकरी देखील अडचणीत आहेत याचा विचार करून सर्व संचालकांनी व शेतकी विभागाने लक्ष देऊन काळजीपूर्वक हंगाम यशस्वी करण्यासाठी काम करावे. हा हंगाम यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी कमीत कमी खर्च करून काटकसरीने हंगाम पार पाडावा असे सांगून हंगाम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.


Comments

Top