HOME   महत्वाच्या घडामोडी

आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा, रावणदहन पाहताना रेल्वेने चिरडले ६१ जणांना, राम कदमांना बोलण्याची बंदी, दुधाच्या अनुदानात टाळाटाळ, मुंबई ते गोवा क्रूझ सेवा, पंतप्रधानांच्या शिर्डी संस्थानचे तीन कोटी.......२० ऑक्टोबर १८

आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा, रावणदहन पाहताना रेल्वेने चिरडले ६१ जणांना, राम कदमांना बोलण्याची बंदी, दुधाच्या अनुदानात टाळाटाळ, मुंबई ते गोवा क्रूझ सेवा, पंतप्रधानांच्या शिर्डी संस्थानचे तीन कोटी.......२० ऑक्टोबर १८

* मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे
* मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई
* अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले
* चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार
* आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट
* पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती
* दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान
* दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून
* पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त
* पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण
* भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी
* दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन
* नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एमंडोस्कोपी
* कार्यक्षमता वाढविण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणेच पाच दिवसांचा आठवडा करावा- राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ
* सरकारने नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी शिर्डी संस्थानकडून ०३ कोटी घेतले, ही लाजीरवाणी गोष्ट- हर्षवर्धन पाटील
* ऊस उत्पादकांची थकबाकी ठेवणार्‍या साखर कारखान्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत नवे परवाने देऊ नयेत- उच्च न्यायालय
* उद्धव ठाकरे यांची रविवारी सकाळी ११ वाजता शिर्डीत तर दुपारी ०१ वाजता नगर शहरात सभा
* नरेंद्र मोदींनी केले साईबाबांच्या चांदीच्या शिक्क्याचे अनावरण
* २०२२ पर्यंत प्रत्येकालाच घर मिळावं हे प्रधानमंत्री आवास योजनेचं वैशिष्ट्य - नरेंद्र मोदी
* नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत आवास योजनेतील १० लाभार्थ्यांना घराच्या चाव्यांचे वाटप
* नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ठाणे, नंदूरबार, अमरावती, सोलापूर, नागपूर, लातूर, साताऱ्यासह विविध जिल्ह्यातील ११ हजार लाभार्थ्यांना ई गृहप्रवेश
* अहमदनगरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी महापालिकेचे पन्नास कोटी राज्य सरकार भरणार- मुख्यमंत्री
* साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख माझ्यासारख्या साईभक्तांना- अशोक चव्हाण
* ०१ कोटी २५ लाख घरे बांधल्याचा सरकारचा दावा खोटा, योजनेचे उद्दिष्ट्य अद्याप अपूर्ण, मोदींनी दिशाभूल केली- अशोक चव्हाण
* परभणी जिल्ह्यातील रोजंदार वनमजूर श्रीनिवास राजूरकरांना कायम करा, साडेसहा वर्षांची मजुरीची ०८ लाख थकबाकी द्या- खंडपीठाचा निकाल
* सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी उठवण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार
* ‘मी टू’ मोहीम पीडित महिलांसाठी, विषय संवेदनशील, कोणीही गैरवापर करू नये, पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप करू नका- मुंबई हायकोर्ट
‘* मी टू’च्या निमित्ताने समोर आलेल्या प्रकरणांसाठी पुरुष व महिलांची समिती स्थापन करायला हवी- उच्च न्यायालय
* मुंबई परिसरातील भाजपकडे वळलेले हिंदी किंवा गुजराती भाषिक मतदार पुन्हा आपल्याकडे येतील का?- शिवसेनेला प्रश्न
* शिवसेना भाजपशी युती करणार- काँग्रेस व राष्ट्रवादीचा अंदाज
* माढा तालुक्यात शौचालय अनुदान लाटल्याच्या तक्रारीनंतर महिला सरपंचाची ज्येष्ठ नागरिकास चपल्लने मारहाण, व्हिडिओ व्हायरल
* औरंगाबाद येथे घरात घुसून लहान मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, आरोपीस तीन महिने सक्तमजुरी, २०० रुपये दंड
* आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग राम मंदिर बांधायला जा- नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला
* राम कदम, मधू चव्हाण आणि अवधूत वाघ यांना माध्यमांशी बोलण्यास भाजपने केली मनाई
* नवरात्रोत्सवात कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात प्रसादाच्या ०१ लाख ३५ हजार लाडूंची विक्री
* पंढरपूर तालुक्यात जवानाला त्याच्या पित्यासह दगडांनी ठेचून मारण्याचा प्रयत्न
* गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आमदार निवास इमारतीला ठोकले टाळे
* अमृतसर-जोदा फाटक येथे रावणदहनासाठी रेल्वे मार्गालगत मैदानात जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले
* अपघातात ५० लोकांचा मृत्यू, ३५ जण जखमी, अपघाताची होणार चौकशी - पंजाबचे मुख्यमंत्री
* मृतांच्या कुटुंबाला पंजाब सरकारकडून ०५ लाख, केंद्राकडून मृतांच्या कुटुंबाला ०२ लाख तर जखमींना ५० हजार
* राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राहुल गांधी यांनी व्यक्त केले दुःख
* बीग बी अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशातल्या ८५० शेतकऱ्यांचं कर्ज परत फेड करत असल्याचं ब्लॉगच्या माध्यमातून केलं जाहीर
* राहुल गांधी आज तेलंगण दौऱ्यावर
* हिंदू नेते प्रचाराला बोलवत नाहीत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांची खंत
* मुसलमानांनी काँग्रेसला अजिबात मतदान करू नये- असदूद्दिन ओवेसींचे आझादांच्या विधानावर आवाहन
* रेल्वे प्रवासासाठी रेल्वेत बुक करता येणार टू बीएचके फ्लॅट, अधिकारी, मंत्र्यांसाठी असणारी सुविधा रेल्वेने सर्वांसाठी केली खुली
* 'लव' आहे, 'जिहाद' नाही, असे नमूद करत एनआयएने केरळमधील 'लव जिहाद' प्रकरणाची फाइल केली बंद
* रेडमी आणणार 'एमआय मिक्स ०३' स्मार्टफोन, १० जीबी रॅम आणि ०५ जी सपोर्ट सलेला हँडसेट


Comments

Top