HOME   महत्वाच्या घडामोडी

अमृतसर भीषण रेल्वे दुर्घटनेत ६१ ठार

रेल्वे आणि संयोजक ढकलतात एक दुसर्‍यावर

अमृतसर भीषण रेल्वे दुर्घटनेत ६१ ठार

अमृतसर: रावणदहन पाहण्यासाठी रुळांवर उभ्या असलेल्या प्रेक्षकांना चिरड्ले. यात ६१ लोक ठार झाले. नवज्योत सिद्धू यांच्या एका समर्थक नगरसेवकानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या घटनेमुळे अमृतसर शहरात तणाव पसरला आहे. लोकक्षोभही वाढला आहे. ही घटना घडत असताना अनेकजण फोटो काढण्यात मग्न होते. याचा निषेध केला जात आहे.
पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर या रावणदहनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. अपघात झाल्यानंतरही रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी घेण्याच्या लोकांच्या वृत्तीवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय नेत्यांपासून सर्व सामान्यांनीही लोकांच्या या वृत्तीवर टीका केली आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर पंजाब सरकारने मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली. आज राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. या घटनेसाठी स्थानिक संयोजक जबाबदार आहे असं रेल्वे म्हणते, तर दरवर्षी याच ठिकाणी हा सोहळा आयोजित केला जातो असं संयोजक म्हणतात.


Comments

Top