HOME   टॉप स्टोरी

कव्हेकरांनी विकत घेतला कचरा!

टाकाऊपासून आकाशिदिवे ठेवले विक्रीला

कव्हेकरांनी विकत घेतला कचरा!

लातूर: लातूर शहरातील प्रभाग १८ मध्ये मेक ईन प्रभाग १८ मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रभागातील महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थांनी टाकाऊ वस्तुंपासून आकाशदिवे बनवले आहेत त्याची विक्री करण्यासाठी प्रभागातच दुकान थाट्ले आहे. टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेला स्वरूप देण्यासाठी विद्यार्थांनी जो सुका कचरा संकलीत केला आहे तो कचरा महानगरपालिका आणि प्रभाग १८ चे नगरसेवक अजित कव्हेकर यांनीविकत घेतला आहे. या मधून २ हजार किलो कचरा मिळाला असून प्रति किलो १० रुपये असा भाव ही देण्यात आला.
यामुळे विद्यार्थीही जाम खूष झाले. विद्यार्थांनी कचर्‍याकडे कचरा म्हणून न पाहता सोने म्हणून पहावे असे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर म्हणाले. येणार्‍या काळात लातूर पॅटर्न शिक्षणासाठी जसा प्रसिद्ध आहे तसा राज्यात कचर्‍यासाठी असेल अशी ग्वाही यावेळी वसूधा फड यांनी दिली. टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थांनी आकर्षक असे आकाशदिव्यांची निर्मीती केली आहे. यात १८०० विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. लातूर शहरात असे प्रकल्प जास्तीत जास्त उभारावेत ज्यामुळे शहरातील कचरा नष्ट होईल अशी अपेक्षा यावेळी लातूर मनपाच्या सहायक आयुक्त वसुधा फड यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, नगरसेविका सरिता राजगिरे, भाग्यश्री शेळके, लातूर मनपा सहायक आयुक्त वसूधा फड, निळकंठ पवार, गोविंद शिंदे, संजय बिराजदार, अफरोज पठाण, शशिकांत हांडे, चंद्रशेखर पाटील प्रभागातील शेकडो नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Comments

Top