logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   टॉप स्टोरी

१९७२ पेक्षा भीषण दुष्काळ- शिवाजी पाटील कव्हेकर

सबंध मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, गांधी चौकात धरणे

१९७२ पेक्षा भीषण दुष्काळ- शिवाजी पाटील कव्हेकर

लातूर: आज गांधी चौकामध्ये जननायक संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये आजुबाजुच्या गावातील शेकडो शेतकर्‍यांनी आपला सहभाग नोंदवला. यावर्षी लातूरसह मराठवाड्यात कमी पाऊस झाला असून दुष्काळग्रस्त परिस्थिशी सामना शेतकरी करतो आहे. यामुळे संपुर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहिर करावा या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी १० ते २ या वेळेत गांधी चौकात धरणे अंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे आणि केंद्र सरकारने यावर उपाय योजना करावी. सोयाबीनला एकरी ५० हजार व ऊसाला ७५ हजार नुकसान भरपाई देण्यात यावी व बिनशर्त कर्जमाफी जाहिर करावी. मराठवाड्यास उजनी धरणासह आंध्रप्रदेशमधील पोरावलम या धरणाचे पाणी द्यावे ज्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यास मदत होईल अशी मागणी शिवाजी पाटील कव्हेकरांनी केली. २०१७-१८ या वर्षातील पिकविमा सरकट देण्यात यावा आणि सुशिक्षीत बेरोजगांना दर महा ०३ हजार रुपयांचा बेकारी भत्ता द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार शिवाजी कव्हेकरांच्या नेतृत्वाखाली
राजन क्षिरसागर, माजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी बी.टी.कदम, प्रा.सतिष यादव, प्रा.मारोती सुर्यवंशी, अ‍ॅड.पद्मसिंह काळे, प्रा.एम.बी. पठाण, नरसिंग इंगळे, परिक्षित सांडूर, बाबासाहेब देशमुख, निळकंठराव पवार, सौ.सुरेखा मुळे, मिलिंद कांबळे, अमर जाधव, प्रतापराव शिंदे इत्यांदींची भाषणे झाली. यावेळी सुर्यकांतराव शेळके,एस.आर.मोरे, आप्पासाहेब पाटील, अशोक पाटील, महादेवअप्पा बोराडे, जफर पटेल, महादेव गायकवाड, राजाभाऊ मुळे, श्रीकांत झाडके, सुनिल बिडवे, राजपाल पाटील, ललित पाटील, भूजंग पाटील, शब्बीरभाई शेख, महेबूब घावटी, राजेसाहेब देशमुख, दौलतराव कोदे्र, शिवराम बारबोले व लातूर, रेणापूर, औसा तसेच लातूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top