HOME   महत्वाच्या घडामोडी

स्पायडरमॅनकार स्टेन ली निवर्तले, पवारांचा संसदेला घेराव, पुण्याचं करा जिजापूर, अवनीच्या बछड्यांचा शोध लागेना, रबी फक्त १३ टक्के, सेल्फी विथ गोमाता.....१३ नोव्हेंबर २०१८

स्पायडरमॅनकार स्टेन ली निवर्तले, पवारांचा संसदेला घेराव, पुण्याचं करा जिजापूर, अवनीच्या बछड्यांचा शोध लागेना, रबी फक्त १३ टक्के, सेल्फी विथ गोमाता.....१३ नोव्हेंबर २०१८

* पेट्रोल १३ तर डिझेल १२ पैशांनी झाले स्वस्त
* अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार, महापौरपदाची निवडणूक लढवणार
* २९ आणि ३० नोव्हेंबरला संसदेला घेराव घालणार, शरद पवार यांचा हल्लाबोल
* पुण्याचं जिजापूर असं नामांतर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी
* शाहू महाराजांना भारतरत्न घोषित करण्याची मागणी
* अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेच्या चित्रपटाचं नागपुरात २५ दिवस चित्रीकरण
* भाजप सरकार राष्ट्रीय आपत्ती- शरद पवार
* आमीरखान महाभारत मालिकेत निभावणार श्रीकृष्णाची भूमिका
* अवनी वाघिणीच्या बछड्यांचा शोध लागेना, जंगलात ठिकठिकाणी अन्न पाण्याची केली व्यवस्था
* संभाजी भिडे आरोपमुक्त, प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यावर खवळले
* तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा परवाना निलंबित, एफआरपी न दिल्याचा परिणाम
* प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने हसन मुश्रीफांच्या साखर कारखान्याचा परवाना निलंबित
* भाजप-सेनेनं मराठी माणसासाठी, मुंबईसाठी काय केलं? नारायण राणेंचा प्रश्न
* मराठवाड्यात रबीची सरासरी १४ टक्के पेरणी
* चंद्रपुरात बिबट्याची दहशत, त्याच्या हल्ल्यात तिघे जखमी
* केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
* आगामी निवडणुकीत प्रतिगामी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र यावे- शरद पवारांचे आवाहन
* एफआरपीएफची चौकशी होईपर्यंत पुणे जिल्ह्यातील भैरवनाथ साखर कारखान्याचा परवाना रद्द
* दाभोलकर हत्येप्रकरणी बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा लावण्यासाठी सीबीआयचा कोर्टात अर्ज
* देवेंद्र फडणवीस पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री, काय नाटके करायची आहेत ती करू द्या, पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसणार- प्रकाश आंबेडकर
* रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला तर तो अर्थव्यवस्थेवरील भूकंप ठरेल- पृथ्वीराज चव्हाण
* पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार नाही- पृथ्वीराज चव्हाण
* विद्यार्थी देखील ग्राहकच, शाळा, महाविद्यालयांनी फसवणूक, गैरव्यवहार केला तर तो ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो- ग्राहक मंच
* पुण्यात शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये चित्रकलेचा अभ्यास पूर्ण न केल्यानं शिक्षकाची मारहाण, सहावीतील विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका
* भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण- दुसऱ्या टप्प्यातील सुनावणीला सुरुवात, शरद दाभाडेची झाली उलटतपासणी
* मालेगाव बॉम्बस्फोट खटला- साक्षीदारांच्या जबाबांची अर्धवट माहिती पुरवली जाते, कर्नल पुरोहितनी केली संपूर्ण माहितीची मागणी
* नाशिक येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार माधवराव गायकवाड यांचे निधन
* पुणे येथे संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मण काशिनाथ तथा आबा अभ्यंकर यांचे वृद्धापकाळाने निधन
* औरंगाबादेत लोंखडी गजाचा ट्रक अडवून लुटमार करणार्‍या लक्ष्मण गाडेस १० वर्षे सक्तमजुरी, १५ लाख दंड
* मुंबईत सायबर चोरांनी पोलिसाच्याच बँक खात्यामधून लंपास केले एक लाख रुपये, गुन्हा दाखल
* २०५० पर्यंत जगभरातील ०९ अब्ज नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणेही होणार अवघड- नॉर्वेच्या संशोधकांचा निष्कर्ष
* पुणे महापालिका ०१ डिसेंबरपासून कर न भरलेल्यांच्या दारात वाजविणार बँड
* भारताची प्रगती, हिंदुशक्ती, हिंदू गतवैभवाला झळाळी या बद्दलची खोटी माहिती सरसकट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते- 'बीबीसी'चा निष्कर्ष
* गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांचा शरद पवारांच्या तिसऱ्या आघाडीला पाठिंबा
* सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये, उभारला वाघा-अटारी बॉर्डरचा सेट
* रामजन्मभूमी खटल्यावर तातडीनं सुनावणी घेण्याची हिंदू महासभेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
* मल्टी मोडल टर्मिनलमुळे गंगेचा पारंपरिक रस्ता आधुनिक सुविधांसह 'नेचर, कल्चर आणि अॅडव्हेंचर' चं केंद्र होणार- पंतप्रधान
* नरेंद्र मोदी यांनी केले देशातल्या पहिल्या मल्टी मोडल टर्मिनलचे लोकार्पण
* कंटेनर जहाज सुरु झाल्याने बंगालच्या उपसागराला वाराणसी जोडले गेले, वाराणसीतून लवकरच रोरो सेवा- पंतप्रधान
* नोटाबंदीमुळं जामिनावर फिरण्याची नामुष्की ओढवलेले मायलेक मला स्वच्छ चारित्र्याचं प्रमाणपत्र काय देणार?- पंतप्रधान
* दिल्लीच्या जीवघेण्या प्रदूषणात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर करत आहेत चित्रपटाचे शूटिंग
* दारू पिऊन दिल्ली-लंडन विमान चालवायला जात असताना एअर इंडियाचे कॅप्टन कटापालिया यांना अडविले सुरक्षारक्षकांनी
* पश्चिम बंगालमध्ये गोरक्षणासाठी तरुणांची 'सेल्फी विथ गोमाता' स्पर्धा
* केंद्र सरकारने ३६ राफेल विमान खरेदी निर्णय प्रक्रियेची सविस्तर माहिती सुप्रीम कोर्टात केली सादर
* पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवशाहीच्या धडकेत ऊसतोड कामगार महिला जागीच ठार
* छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १८ जागांसाठी ७० टक्के मतदान
* श्री रामचंद्रांच्या मनात असेल तेव्हाच अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू होईल- उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा
* कॉमिक्स जगताचे महानायक स्पायडर मॅनचे निर्माते स्टेन ली यांचे वृध्दापकाळाने निधन
* उत्तर कोरियाचे १६ ठिकाणी छुपे आण्विक तळ


Comments

Top