HOME   टॉप स्टोरी

मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज लातूरात!

१५० फूट उंच राष्ट्रध्वज, ०१ जानेवारीला अनावरण

मराठवाड्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज लातूरात!

लातूर: लातूर शहरातील क्रीडा संकुलात मुख्य प्रवेशद्वाराजवळ विशाल राष्ट्रध्वज उभारणीचे काम चालू आहे. मराठवाड्यातील सर्वात उंच ध्वज उभारण्याचा मान लातूर जिल्ह्यास मिळाला आहे. १५० फूट उंचीचा तिरंगा फडकवला जातो आहे. ०१ जानेवारी रोजी याचे अनावरण केले जाणार आहे. यावेळी ११ हजार विद्यार्थी राष्ट्रगिताचे समूह गायन अरणार आहेत. राष्ट्रध्वज सर्वांच्या राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहे. हे प्रतिक महाराष्ट्रात बर्‍याच शहरांमध्ये असून ते लातूरात भव्यदिव्यही असावे यामुळे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या प्रयत्नातून यासाठी ७२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्हा क्रीडा संकुलात समोरच्या बाजूला याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ध्वजाची उंची १५० फूट असणार आहे. याचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या ध्वजाच्या सुरक्षेसाठी पाच कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याबद्दल नगरसेविका श्वेता लोंढे यांनी आभार मानले आहेत.


Comments

Top