HOME   लातूर न्यूज

शहिद जवान रोहित शिंगाडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पालकमंत्री निलंगेकर यांच्याकडून रोहित शिंगाडे यांना श्रद्धांजली

शहिद जवान रोहित शिंगाडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लातूर: सेवन महार रेजिमेंटचे जवान लान्स नायक रोहित उत्तम शिंगाडे हे जम्मू काश्मीरमधील सियाचीन भागातील सीमेवर बर्फाळ प्रदेशात कर्तव्य बजावत असताना ऑक्सिजन कमी पडल्याने १० नोव्हेंबर रोजी बेशुद्ध पडले. दिल्ली येथे उपचारादरम्यान त्याना वीरमरण आले. आज जळकोट येथे शहिद रोहित शिंगाडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कामगार कल्याण, कौशल्य विकास भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, जळकोट नगरपंचायतीचे नगराध्यक्ष किसनराव धुळशेट्टे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रृंगारे, नायब तहसीलदार तांदळे, नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीमती देशमुख, पोलीस पथक, सेवन महार रेजीमेंटचे जवान, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, शिंगाडे कुटुंबीय व जळकोट शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी शहीद जवान रोहित शिंगाडे यांना पालकमंत्री निलंगेकर, आमदार भालेराव, नराध्यक्ष किसनराव धुळशेट्टे व इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. तसेच निलंगेकर यांनी शहीद जवान रोहित शिंगाडे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियाचे सांत्वन केले. त्यानंतर पोलीस पथकाने व सेव्हन महार रेजिमेंटच्या जवानांनी बंदुीच्या हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी जळकोट शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी शोकाकूल वातावरणात रोहित शिंगाडे यांना अखेरचा निरोप दिला.
शहीद जवान ढगे यांच्या कुटुंबियाची भेट पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाटोदा बुद्रुक तालुका जळकोट येथील शहीद जवान विजयकुमार ढगे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वना केली. यावेळी आमदार सुधाकर भालेराव हे ही उपस्थित होते.


Comments

Top