HOME   लातूर न्यूज

समाजहित सांभाळण्याठी पत्रकारांना हवे डिजिटल प्रशिक्षण

पत्रकार दिन कार्यक्रमात- प्रा. शिवशंकर पटवारी

समाजहित सांभाळण्याठी पत्रकारांना हवे डिजिटल प्रशिक्षण

लातूर: डिजिटल युगातील पत्रकारिता दुधारी शस्त्र आहे. पण याचा वापर करणाऱ्यांना पत्रकारितेची नितीमूल्यांची माहिती नसते. त्याप्रमाणेच त्यातून निर्माण होणाऱ्या चांगल्या –वाईट परिणामांची समज नसते. त्यामुळे शासन व विविध पत्रकार संघटनांनी एकत्रीत येऊन समाजाचे हित साधण्यासाठी डिजिटल युगातील पत्रकारांना कौशल्यआधारित प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राजर्षि शाहू महाविद्यालयातील वृत्तपत्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिवशंकर पटवारी यांनी केले.
विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्तच्या डिजिटल युगातील पत्रकारिता अचारनिती व आव्हाने या विषयावरील चर्चासत्रात प्रा.पटवारी बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जेष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे, सहाय्यक संचालक मिरा ढास, दूरदर्शनचे प्रतिनिधी दिपरत्न निलंगेकर, टी.व्ही.9 चे प्रतिनिधी महेंद्र जोधळे, पत्रकार मुरलीधर चेंगटे, निखील माने, श्री.दाभाडे अदि पत्रकार उपस्थित होते.
प्रा.पटवारी पुढे म्हणाले की,सध्या डिजिटल पत्रकारिता अपरिपक्व लोकांच्या हाती असून हे लोक पत्रकार नसून फक्त अशय निर्माण करणारे आहेत. व त्यांच्या स्वत:च्या मर्यादा असल्याने त्यातून समाजहित साध्य होत नाही.तरी अशा लोकांना किमान प्रत्येक जिल्हा स्तरावर एकत्रित करुन त्यांना शासन अथवा पत्रकार संघटनेच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळाले पाहीजे. प्रशिक्षीत डिजिटल पत्रकारिता भारताच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


Comments

Top