HOME   टॉप स्टोरी

लातुरात एमआयएम अली पक्षानं काढली मोटारसायकल रॅली

जातीयवाद समूळ नष्ट करण्याचे आवाहन

लातुरात एमआयएम अली पक्षानं काढली मोटारसायकल रॅली

लातूर: हजरत अली टिपू सुलतान यांच्या जयंती निमीत्त लातूर शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. टिपू सुलतान यांच्या विचारांचा प्रसार समाजात करणे गरजेचे आहे. देशात दिवसेंदिवस जातीयवाद वाढत जात आहे यामुळे अश्या समाज पुरुषांच्या विचाराचे आचरणात आणावे ज्यामुळे जीवन सुकर होईल. जातीयवादाला खत पाणी न घालता तो समूळ कसा नष्ट करता येईल याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्य्क्त करण्यात आली. ही रॅली गरुड चौक, विवेकानंद चौक, शाहू चौक, गोलाई, गांधी चौक, या मार्गाने निघाली आणि टिपू सुलतान चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये तरुणाईचा समावेश लक्षणीय होता.


Comments

Top